Dharashiv Loksabha News : धाराशिवमध्ये मोठा ट्वि्स्ट; ठाकरेंच्या ओमराजेंविरोधात अजित पवार 'हा' हुकमी एक्का काढणार

Loksabha Election 2024 : धाराशिव लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून या जागेवर महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी दावा केला होता.पण आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याची माहिती आहे.
Dharashiv Lok Sabha Constituency
Dharashiv Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : एकीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ चांगलेच चर्चेत आले आहे.कधी उमेदवारीहून नाराजीनाट्य तर कधी दावे- प्रतिदावे निमित्त ठरत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या, महायुतीने प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर शुक्रवारी (ता.29) सुटला आहे.

ही जागा महायुतीत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळाली आहे. धाराशिवच्या जागेवरुन प्रचंड खल झाल्यानंतर आता ठाकरेंच्या ओमराजेंविरोधात अजितदादा आता कुणाला उतरवणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे उमेदवारांबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम असतानाच आता मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Dharashiv Lok Sabha Constituency
Dharashiv loksabha News : शिंदेंनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिवचा तिढा अखेर सुटला: 'या' पक्षाला मिळणार जागा, पण...

धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची उमेदवारी ठाकरेंकडून जाहीर झाली असल्याने त्यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. पण त्याचवेळी महायुतीचा उमेदवार तर सोडाच पण जागावाटपाचा गोंधळही मिटत नव्हता. मात्र, अखेर शुक्रवारी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली. याठिकाणी आता महायुती आणि अजित पवार मोठा डाव टाकण्याची शक्यता असून ओमराजेंविरोधात आपला हुकमी एक्का बाहेर काढण्याच्या तयारीत आहे.

लातूर जिल्हयातील भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.तेच धाराशिवमधून ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्या ओमराजेंविरोधात निवडणूक लढवू शकतात.याचवेळी राहुल मोटे यांचेही नाव महायुतीत उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच महाविकास आघाडी व महायुतीकडून जागावाटपावर चर्चा सुरु आहे.पण महायुतीत ज्या मतदारसंघावरुन जागावाटपाचं घोडं अडलं होतं त्यात धाराशिवचा देखील समावेश होता.या जागेसाठी अजित पवार व शिवसेना यांच्यात चढाओढ होती.

भाजपकडून या जागेवर वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, संताजी चालुक्य, यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू होती.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सुरेश बिराजदार,आमदार विक्रम काळे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यात ही दोन नवे चेहरे समोर आल्याने धाराशिवमधून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Dharashiv Lok Sabha Constituency
Madha Lok Sabha Constituency : शरद पवारांनी वाढविले मोहिते पाटलांचे टेन्शन; माढ्यातून तुतारी मिळणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com