Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाला सुरुंग? झिरवाळ शरद पवारांच्या संपर्कात

Ajit Pawar Ncp News : बजरंग सोनवणेनंतर नीलेश लंकेही शरद पवार गटाच्या मार्गावर आहेत. अशातच नाशिकमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
sharad pawar ajit pawar
sharad pawar ajit pawarsarkarnama

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ ( Dindori Lok Sabha Constituency 2024 ) राजकीय हालचालींमुळे चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेले नरहरी झिरवाळ ( Narhari Zirwal ) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा सुरुंग लागण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ( Narhari Zirwal ) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ ( Gokul Zirwal ) यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात गोकुळ झिरवाळ यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उमेदवारीची मागणी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याची तयारी दर्शविल्याने हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीचे प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांना जागावाटपावरून सतत धक्के बसत आहेत. आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी राजीनामा देऊन शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) यांनी बीडमध्ये शरद पवार गटाला साथ दिली आहे. नाशिकमध्ये राज्याचे अन्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhgan Bhujbal ) यांनी कमळाचे चिन्ह घेऊन उमेदवारी करण्याबाबत मोठा दबाव आहे. अशा स्थितीत अजित पवार गटाची चांगलीच राजकीय कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

sharad pawar ajit pawar
Chhagan Bhujbal News : भुजबळांचे राजकारण संपवून देव-देव करायला पाठवू; सकल मराठा समाजाच्या शिलेदाराची प्रतिज्ञा!

दिंडोरी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या पक्षाकडे उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. प्रारंभी उमेदवारांची वानवा असलेल्या दिंडोरीत आता शरद पवार गटाकडे अनेक पर्यायी उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राष्ट्रवादी शरद पवार गटाची स्थिती या मतदारसंघात मजबूत झालेली दिसते.

दिंडोरी मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्राबल्य आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्याची येथील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. या निर्णयाच्या विरोधात सातत्याने आंदोलन झाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्यातबंदी जाहीर होताच चांदवड येथे मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच विविध नेत्यांनीदेखील या प्रश्नांवर आवाज उठवला. त्यामुळे भाजप या मतदारसंघात बॅकफूटवर आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

R

sharad pawar ajit pawar
Nashik Lok Sabha Constituency : चर्चा भुजबळांच्या उमेदवारीची, अजित पवारांचे मात्र..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com