Loksabha Election 2024 : 'वंचित'मुळे घोडे अडल्याने नांदेडमध्ये 'मविआ'ची कोंडी; महायुतीला कशी देणार टक्कर?

BJP Politics : भाजपने अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेऊन नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला कमकुवत केले आहे. त्यातच अशोक चव्हाण आता जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची तयारी करत आहेत. गेल्यावेळी वंचितने चांगली मते घेतली होती, पण जागावाटपाचा निर्णय न झाल्याने वंचितचे तळ्यात-मळ्यात आहे
prakash ambedkar nana patole ashok chavan
prakash ambedkar nana patole ashok chavansarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News :

लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका घेऊन जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात नांदेडची जागा काँग्रेसला तर महायुतीत भाजपला सुटणार, हे निश्चित मानले जात आहे. अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशमुळे भाजपचा बारा हत्तींचे बळ मिळाले आहे. मजबुत महायुतीच्या आव्हानाला महाविकास आघाडी टक्कर द्यावी लागणार आहे, तर दुसरीकडे वंचितचे घोडे अजूनही अडलेलेच आहे. (Loksabha Election 2024)

prakash ambedkar nana patole ashok chavan
Nanded BJP News: नांदेडमध्ये शत-प्रतिशत भाजप की अशोक चव्हाण ?

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेस कमकुवत झाली तशी महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपात काँग्रेसला नांदेडची जागा तर महायुतीच्या जागावाटपात भाजपला सुटणार, हे जवळपास ठरल्यासारखे आहे. भाजपमध्ये (BJP) उत्सुक उमेदवारांची संख्या जास्त आहे तर दुसरीकडे काँग्रेसला उमेदवार शोधावा लागत आहे. यावरून‌ महाविकास आघाडीची स्थिती लक्षात येते.

नांदेडची (Nanded Loksabha Constituency) जागा आजवर काँग्रेसने लढवली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. जिल्ह्यातील काही भाग वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक पातळीवर काम फारसे नाही. त्यातच पक्षात फूट पडल्यानंतर परिस्थिती नाजूक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ कमी झाले आहे. याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे संघटनात्मक काम आहे. चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडी जन्माला आली. त्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग आहे. पुढे शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) समावेश आहे, असा दावा केला जात असला तरी जागावाटपचा अंतिम निर्णय झालेला नाही.

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ यशपाल भिंगे यांनी तब्बल 1 लाख 60 हजार मते घेतली होती. त्यामुळे 'वंचित' जर महाविकास आघाडीचा घटक झाला तर न काँग्रेसला खूप मोठा आधार मिळू शकतो. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जायचा. या जिल्ह्यातील राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेसची स्थिती अवघड झाली असून, अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. ज्या काँग्रेसने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले, खासदार केले, अनेक मंत्रिपदे दिली, काही मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. तेच अशोक चव्हाण आज भाजपमध्ये जाऊन नांदेड जिल्हा काँग्रेसमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दोन वेळा उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले होते. त्यांच्या आधी डी. बी. पाटील निवडून आले होते. आता भाजप गेल्या निवडणुकीच्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्व हातखंडे वापरण्यासाठी सज्ज झाला आहे.

भाजपने निवडणुकीची तयारी खूप आधीपासून सुरू केली आहे. पक्षाचे संघटनात्मक पातळीवर काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, अशोक चव्हाण यांचे नियोजन, त्यांची नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात असलेली मजबूत पकड याचा फायदा महायुतीला मिळणार आहे. दुसरीकडे काँग्रेसची कमकुवत परिस्थिती, सक्षम नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची होणारी गळती यामुळे महाविकास आघाडीची स्थिती बिकट होत चालली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

prakash ambedkar nana patole ashok chavan
Uddhav Thackeray On Amit Shah: तुळजाभवानीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी शाहांना ठरवलं खोटं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com