Uddhav Thackeray On Amit Shah: तुळजाभवानीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी शाहांना ठरवलं खोटं...

Dharashiv Shivsena UBT Melava : अट्टल व सच्चा शिवसैनिक काय असतो हे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील हे मूर्तिमंत उदाहरण आहेत.
Uddhav Thackeray, Amit Shah
Uddhav Thackeray, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : मातोश्रीवर येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे व भाजपचा अडीच वर्षे होईल. अडीच वर्षांच्या काळात भाजपला सांभाळून घ्या, असे वचन गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते. मात्र, मी ते वचन दिलेच नाही अशी बोंब ते मारत आहेत.

पण आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शाहांनी मला मातोश्रीवर येऊन अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचे वचन दिले होते, असे पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत ठणकावून सांगितले.

उमरगा येथील जनसंवाद यात्रेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बोलत होते. या वेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार संजय राऊत, आमदार कैलास पाटील, नेत्या सुषमा अंधारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव ऊर्फ बाबा पाटील, महेश देशमुख, नाना भोसले, विजय वाघमारे, सुभाष राजोळे उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Amit Shah
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्र्वादीत जुंपली, शरद पवारांना जाब विचारणाऱ्या आमदार शेळकेंची बाफनांनी लायकीच काढली!

ठाकरे म्हणाले, अट्टल व सच्चा शिवसैनिक काय असतो हे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील हे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे सांगत त्या दोघांचे जाहीर अभिनंदन केले. तसेच माजी खासदार रवींद्र गायकवाड, व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावरही त्यांनी टीका केली.

त्याबरोबरच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या बसवराज पाटील (Basavraj Patil) यांचाही शेलक्या शब्दांत समाचार घेतला. तसेच मी राज्यभर संवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहे. या सभेमध्ये इतर सर्व धर्मियांसह मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर येत असून, आमचे हिंदुत्व हे सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, भाजपच्या (BJP) गोमूत्रधारी हिंदुत्वासारखे नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ही लढाई भावी पिढीसाठी असून, उद्या आम्ही जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करीत ज्यांना भाजपमध्ये जायचे असेल त्यांनी आता जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

भाजपने (BJP) जरी आमदार खासदार विकत घेतले असले तरी पन्नास खोक्यांमध्ये संपूर्ण राज्यातील जनता तुम्हाला विकत घेता येणार नाही, असा टोला लगावला व ही जनता लाचार नसल्याचे सांगत आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत, असा इशाराही त्यांनी मोदी - शाह यांनी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Uddhav Thackeray, Amit Shah
Raosaheb Danve News : बीड लोकसभेसाठी पंकजा की प्रीतम मुंडे ? रावसाहेब दानवेंनी दिलं 'हे' उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com