Parbhani Lok Sabha Constituency : खासदार जाधवांना निष्ठा कामाला येणार की विरोधकांचे आरोप अडथळा ठरणार ?

Shivsena UBT News : संजय जाधव यांनी दोन वेळा परभणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
MP Sanjay Jadhav
MP Sanjay Jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने प्रेरित झालेल्या अनेक तरुणांनी राजकारणात प्रवेश केला आणि सामान्य कुटुंबातील युवकांनी राज्यात राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले. कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ जनतेच्या प्रश्नावर लढा देण्याच्या शिवसेनेच्या आक्रमक आंदोलन पद्धतीमुळे जनतेत शिवसैनिकांविषयी आत्मीयता निर्माण झाली. या बळावरच जनतेने शिवसैनिकांना भरघोस मतदान केले.

असेच एक शिवसैनिक म्हणजे परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव. निवडणुकीच्या मैदानात तिसऱ्यांदा उतरत असलेल्या जाधव यांना यावेळची निवडणूक अतिशय वेगळी असणार आहे. त्यांची निष्ठा कामाला येते की विरोधकांचे आरोप अडथळा ठरतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Parbhani Lok Sabha Constituency)

संजय जाधव यांनी दोन वेळा परभणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. पक्षाने याची दखल घेत त्यांना उपनेतेपदी बढती दिली.

पक्षनिष्ठा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा या जमेच्या बाजू असल्या तरी जाधव यांच्यासमोर अनेक अडथळे असणार आहेत. पक्षाचे बदललेले नाव आणि चिन्ह यावेळी नसणार आहे. तसेच भाजपची आक्रमक प्रचारयंत्रणा सक्रीय झाली आहे. अयोध्येत झालेल्या प्रभू श्रीराम मंदिराचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे.

MP Sanjay Jadhav
Manoj Jarange Patil : 'जरांगे पाटलांची भाषा राजकीय, त्यांच्या मागे कोणीतरी...'; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आता उघडपणे आरोप करत आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी लाट असल्यामुळे जाधव यांचा विजय झाला असे जाहीर सभांमधून बोलले जात आहे. केंद्र सरकारच्या अमृत रेल्वे स्टेशन विकास योजनेच्या कार्यक्रमप्रसंगी परभणीत झालेल्या कार्यक्रमात जाधव आणि स्थानिक भाजप नेत्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मोदी लाट असल्यानेच जाधव यांचा विजय झाला असे खासदारांच्या उपस्थितच सांगण्यात आल्याने जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे झाले नसल्याबद्दलही विरोधकांकडून जाधव यांच्यावर नेहमीच आरोप केला जातो. तसेच मानवत येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही खासदारांची मग्रुरी मोडून काढा असे आवाहन केले.

शिवसेना प्रमुखांच्या आदेशाला शिरसावंद्य मानून त्यांनी दिलेल्या प्रत्येक नावाला परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेने नेहमीच निवडून दिले. त्यामुळे खासदार संजय जाधव हे पक्षाशी निष्ठावंत आहेत. विरोधक मात्र अँटी इन्कम्बन्सी ची वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे खासदार संजय जाधव यांची निष्ठा कामाला येते की विरोधकांच्या आरोपांचे अडथळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

MP Sanjay Jadhav
Manoj Jarange Patil : 'जरांगे पाटलांची भाषा राजकीय, त्यांच्या मागे कोणीतरी...'; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com