Parbhani Loksabha Constituency : परभणीत ठाकरे गट विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादीच भिडणार? दाव्यावर ठाम!

Uddhav Thackeray vs Ajit Pawar News : मतदारांना पुन्हा एकदा संजय जाधव आणि राजेश विटेकर यांच्यातील सामना बघायला मिळण्याची चिन्हं.
Uddhav Thackeray vs Ajit Pawar
Uddhav Thackeray vs Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याने महायुतीच्या जागावाटपात परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू राजेश विटेकर हे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे मतदारसंघातील मतदारांना पुन्हा एकदा संजय जाधव आणि राजेश विटेकर यांच्यातील सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार संजय जाधव आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये संजय जाधव यांनी विजय मिळवला होता, तर राजेश विटेकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. मात्र, संजय जाधव यांनी शिवसेना उबाठा गटावर निष्ठा दाखवली, तर राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना समर्थन दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांना गेल्या निवडणुकीत राजेश विटेकर यांचा झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. यासंदर्भातील एका कार्यकर्त्याशी बोलताना त्यांची ऑडिओ क्लीपही चांगलीच गाजली होती. परभणीकरांनो तुम्हाला हात जोडले पाहिजे, तुम्ही राजेशसारख्या चांगल्या उमेदवाराला पाडले, अशी उद्विग्नता अजित पवार यांनी यात बोलून दाखवली होती. त्यामुळे आता 2024 मध्ये परभणीतून पुन्हा राजेश विटेकर यांना उमेदवारी देऊन गेल्यावेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.

Uddhav Thackeray vs Ajit Pawar
Amit Shah Rally News : अमित शाहांच्या सभेत छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार ठरणार ?

अजित पवार यांनी पक्षफुटीनंतर परभणीवर आपले अधिक लक्ष केंद्रित केले होते. अगदी परभणीच्या पालकमंत्रिपदी त्यांनी आपले विश्वासू संजय बनसोडे यांची नियुक्ती केली. जिल्हा नियोजन समितीत राष्ट्रवादीच्या सदस्यांना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न केला. निधी देतानाही हात आखडता घेतला नाही. राज्यात महायुती म्हणून लोकसभा निवडणुकांना समोर जाताना परभणीची जागा आपल्याकडे असावी, यासाठी अजित पवार आग्रही आहेत.

अजूनही त्यांनी या जागेवरचा आपला दावा सोडलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. राष्ट्रवादीचा दावा भाजप(BJP) आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मान्य केला, तर परभणीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी फाइट पाहायला मिळू शकते. भाजपनेही परभणी लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे तयारी केली आहे. मात्र, अजित पवार यांनी परभणीच्या जागेचा आग्रह सोडला नाही, तर भाजप माघार घेऊ शकते, असे बोलले जाते.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांनी परभणीचा दौरा करून संघटनात्मक कार्याचा आढावा नुकताच घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, भारतीय जनता पार्टीची आक्रमक प्रचार यंत्रणा, तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा याचा फायदा राजेश विटेकर यांच्यासाठी करून घेण्याचा आणि मराठवाड्यातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. अर्थात राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी मोडून काढत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याची कसरत या पक्षाला करावी लागणार आहे.

Uddhav Thackeray vs Ajit Pawar
Basavraj Patil News : भाजपमध्ये दाखल होताच धाराशिवसाठी बसवराज पाटलांनी दंड थोपटले..

परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे निष्ठावंत या मुद्द्यावर शिवसेना उबाठा गटाची प्रचार यंत्रणा केंद्रित असू शकते. तसेच जाधव यांचे धार्मिक व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध कथा प्रवक्ते पं. प्रदीप मिश्रा व बागेश्वर धाम सरकार धीरज शास्त्री यांच्या कथांचे भव्य आयोजन, आक्रमक हिंदुत्वाची कार्यशैली याचा फायदा जाधव यांना होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याने त्याचाही फायदा जाधव यांना मिळू शकतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com