Basavraj Patil News : भाजपमध्ये दाखल होताच धाराशिवसाठी बसवराज पाटलांनी दंड थोपटले..

Loksabha Election 2024 : पक्षाने संधी दिली तर महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीचे बसवराज अशी लढत धाराशिवमध्ये पहायला मिळू शकते...
Basavraj Patil News
Basavraj Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाला तीन दिवस झाले नाही, तर त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली. पक्षाने संधी दिली तर आपण लोकसभा लढवण्यास तयार आहोत, असे सांगत त्यांनी दंड थोपटले आहे. महायुतीकडून जिल्ह्यात डझनभर इच्छुक असताना त्यात आता बसवराज पाटलांचीही भर पडली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसवराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे त्यांना पक्षाने धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द तर दिला नाही ना? अशी चर्चा त्यांच्या लोकसभा लढवण्याच्या इच्छेनंतर झडू लागली आहे. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र अशी ओळख असलेले बसवराज पाटील मुरूमकर यांनी थेट लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Basavraj Patil News
Rajan Salvi News : आमदार राजन साळवींच्या पत्नींना अश्रू अनावर; नेमकं काय घडलं ?

पक्षाने संधी दिली तर महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीचे बसवराज अशी लढत धाराशिवमध्ये पहायला मिळू शकते. अर्थात बसवराज यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी तिला राज्य आणि केंद्र पातळीवरील नेत्यांच्या समंतीचे पाठबळ मिळते का? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. पक्षाने संधी दिल्यास धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास आपण सज्ज असल्याचे बसवराज पाटील यांनी म्हटले आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सज्ज असलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यात माजी राज्यमंत्री आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि बसवराज पाटील मुरूमकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बसवराज पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेस अशक्त झाल्याचे चित्र आहे. पाटील यांनी काँग्रेस मधील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना अद्याप भाजपमध्ये सोबत आणलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे भविष्यात काँग्रेसमधील (Congress) त्यांचे किती जुने सहकारी निवडणुकीच्या तोंडावर बसवराज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात येतात हे पहावे लागेल. संस्थात्मक राजकारणाचा मोठा पसारा बसवराज पाटील यांच्यासोबत आहे. या सर्व संस्थांमधील कर्मचारी आणि त्यांच्याशी निगडित असलेले मतदार ही बसवराज पाटील यांची जमेची बाजू आहे. यापूर्वी ठाकरे सेनेचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना हक्काची मदत देणाऱ्या महत्त्वपूर्ण नेत्यांपैकी बसवराज पाटील हे स्वतः एक राहिलेले आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना बसवराज पाटील यांची अनेकदा मदत झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे बसवराज पाटील (Basavraj Patil) हेच स्वतः उमेदवार म्हणून ठाकरे सेने समोर शड्डू ठोकून उभे राहणार असतील, तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासमोर ते आव्हान असणार आहे. धाराशिव जिल्ह्यासह शेजारचा लातूर आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातही लिंगायत समाज बांधवांची संख्या लक्षणीय आहे.

Basavraj Patil News
Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या 'करप्ट मॅन'ला मुख्यमंत्री शिंदेंचं 'कॉमन मॅन'नं उत्तर

बसवराज पाटील या परिसरातील लिंगायत समाजाचे सर्वात मोठे नेते मानले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे लिंगायत समाज लोकसभा निवडणुकीत बसवराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसवराज पाटील महायुतीकडून लोकसभेच्या आखाड्यात उतरले तर ठाकरे गटाची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

त्यात लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी धाराशिव- कळंब वगळता पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचा वरचष्मा आहे. ही बाब बसवराज पाटील यांच्यासाठी जमेची ठरू शकते. ठाकरे सेनेचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना भिडण्याची तयारी बसवराज पाटील यांनी दाखवली तर आहे, आता त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार का? हे पहावे लागेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Basavraj Patil News
Dharashiv Political News : पक्ष फोडण्याचा दांडगा अनुभव असणाऱ्या नार्वेकरांच्या मतदारसंघात तीन निर्भय सभा घेणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com