Beed News : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपणच करू शकतो. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचून प्रचार करा. तुम्ही बूथ मजबूत करा, मी जिल्हा मजबूत करते, असे आवाहन भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. पालकमंत्री असताना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. निधी देताना कुठलाही भेदभाव केला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या येथील जिल्हा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड मतदारसंघातील सर्व बूथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी यांची बैठक झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंकजा मुंडे यांनी बूथप्रमुखांना प्रचार आणि मतदानाच्या अनुषंगाने सूचना करत जोमाने काम करण्याचे आवाहन केले. आपण पालकमंत्री असताना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. निधी देताना कुठलाही भेदभाव केला नाही. आपण कायम सर्व घटकांना सोबत घेऊन काम केल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.