Shivsena UBT News : तेजस ठाकरेंची सभांना हजेरी, राजकारणात सक्रीय होणार?

Tejas Thackeray : संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी स्टेडिअम मैदानावर केलेले भाषण तेजस ठाकरे यांनी डीमध्ये बसून ऐकले. त्यांच्यासाठी तिथे स्वतंत्र सोफा ठेवण्यात आला होता.
Tejas Thackeray
Tejas Thackeraysarkarnama

Loksaba Election : लोकसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. उद्धव ठाकरेंचा Uddhav Thackeray महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू आहे. उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे हे देखील जाहीर सभा घेत महायुतीवर सडकून टीका करत आहेत. मात्र, नुकतीच परभणीमध्ये झालेली उद्धव ठाकरेंची सभा वेगळी ठरली पावसात झालेल्या या सभेला उद्धव ठाकरेंचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

Tejas Thackeray
Sharad Pawar News : भाजप-शिवसेनेत दुरावा निर्माण व्हावा म्हणून पवारांनी 2014 ला केला होता 'हा' प्लॅन!

संजय जाधव Sanjay Jadav यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी स्टेडिअम मैदानावर केलेले भाषण तेजस ठाकरे यांनी डीमध्ये बसून ऐकले. त्यांच्यासाठी तिथे स्वतंत्र सोफा ठेवण्यात आला होता. तेजस ठाकरे वडील आणि भावासोबत राजकीय मंचावर आणि कार्यक्रमात सातत्याने वावरताना दिसतात. त्यामुळे तेजस Tejas Thackeray राजकारणात सक्रिय होण्याच्या चर्चा सुरूच असतात.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे अनेक वर्षापासून राजकारणात कार्यरत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे आता चांगलेच परिपक्व झाल्याचे दिसून येते. आता याच आदित्य ठाकरे यांचे दुसरे बंधू तेजस ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री कधी होणार याची चर्चा सुरू आहे. याआधी त्यांच्या लाॅचिंगच्या चर्चा अनेकदा झाल्या त्या मागे त्यांची राजकीय सभा, मेळाव्यांना असलेली हजेरी हे प्रमुख कारण होते.

राजकारणात सक्रिय होण्यासाठी अनेकदा माध्यमांनी तेजस यांनी विचारणा केली आहे. तेव्हा राजकारण हे आपले क्षेत्र नसल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. पण सातत्याने राजकीय सभा आणि व्यासपीठावर तेजस ठाकरे यांचा वाढता वावर पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून हे 'तेजस अस्त्र' बाहेर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवघ्या 29 वर्षांचे असणारे तेजस ठाकरे हे भारतीय संरक्षक आणि वन्यजीव संशोधक म्हणून परिचित आहेत. साप, खेकडा, सरडा, पाल, मासे यांच्या नवनवीन प्रजातींचा शोध लावून त्यांना नावे देण्याचा वन्यजीव संशोधक म्हणून तेजस ठाकरे यांचा नावलौकिक आहे. नुकतीच अमेरिकेच्या फोर्ब्स या मासिकाने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com