Sanjay Jadav : "...म्हणून एकनाथ शिंदे तुम्ही CM पदाचा राजीनामा द्या, ठाकरेंची माफी मागा अन् परत या!"

Shinde vs Thackeray: खासदार संजय जाधव यांचा शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला
Eknath Shinde Uddhav Thackeray
Eknath Shinde Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : शिवसेनेतील फुटीनंतर आता कोणते आमदार अपात्र ठरणार याचा निकाल १० जानेवारीला लागणार आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार पडणार असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानहानी टाळून आपली प्रतिमा राखायची असेल तर राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंपुढे शरणागती पत्कारावी. झाकली मूठ ठेवून ३१ डिसेंबरपुर्वीच राजीनामा द्या, असा सल्ला परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Lok Sabha Election : गडकरी, फडणवीस अन् 'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेस लोकसभेचा शंखनाद करणार

अपात्र आमदारांच्या सुनावणी संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी वेळ वाढवून मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत निर्णय देण्यास अध्यक्षांना सांगितले आहे. त्यामुळे आता जानेवारीमध्ये कोण अपात्र ठरणार,याचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आपल्याच बाजुने निर्णय लागणार असल्याचा दावा करण्यात येतो आहे. मात्र, शरण से मरण टल सकता हे हे रामायणातील उदाहरण देत संजय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना माफी मागण्याचा सल्ला दिलाय.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीनंतर एकनाथ शिंदे यांना संपवणे किती जड आहे, असा टोला खासदार जाधव यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाने व्हीप हा सुनील प्रभूंचा असल्याचे सांगितल्यानंतर हे लोक म्हणतात आम्हाला व्हीप मिळालाच नाही. जर, व्हीप मिळाला नव्हता तर मग सरकार अल्पमतात आल्याचं सांगायला राज्यपालांकडे गेला होता का,असा सवाल खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारमध्ये असलेल्यांकडे माणसंच नाहीत. जे आहेत ते चिल्लर आहेत. आणि त्यांचाच उपयोग दुसऱ्या पक्षांची माणसं फोडण्यासाठी केला जातोय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आमदार पाडण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. मात्र, जनता सर्मथ आहे. त्यांच्यावर कोणत्याही ताकदीचा परिणाम होणार नाही, असे खासदार जाधव म्हणाले.तर, महाराष्ट्रात सुरुवातील हिंदू-मुस्लिम वाद घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने आता मराठा आणि ओबीसी वाद घडवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय जाधव यांनी सरकारवर केला.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com