Suresh Kute Joined BJP : अमित शाह नव्हे चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत सुरेश कुटेंचा झाला भाजपमध्ये प्रवेश!

Suresh Kute News : 'द कुटे' उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालिका अर्चना कुटे यांनीही केला भाजपमध्ये प्रवेश
Suresh Kute Joined BJP
Suresh Kute Joined BJPSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics News : 'द कुटे ग्रुप'चे प्रमुख सुरेश कुटे यांच्यासह त्यांच्या पत्नी व द कुटे उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालिका अर्चना कुटे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर नवी दिल्लीत सुरेश कुटे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, घाईत त्यांनी भाजपमध्ये एन्ट्री केली असं दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suresh Kute Joined BJP
Bjp vs Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचे राजकीय मूल्यमापन काय हे समजून घ्यावे, दरेकरांचा हल्लाबोल

सुरेश कुटे यांच्या कंपन्यांची मागच्या महिन्यात केंद्रीय आयकर विभागाकडून तपासणी झाल्यानंतर ते अध्यक्ष ज्ञानराधा मल्टिस्टेटची आर्थिक कोंडी झालेली असताना त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा, त्यातच त्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचा गुंतवणूकदार भेटणे आणि मग लागलीच भाजप प्रवेश यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

कापड दुकान ते तिरुमला ऑईल, तिरुमला हेअर ऑईल, तिरुमला डेअरी, ओएओ इन्फो, डीएनआर इंडिया अॅटोटेक, तिरुमला ट्रेड्स, तिरुमला अॅग्रो, डीएनएस सप्लाय अशा विविध कंपन्या व साधारण १७ हजार कोटी रुपयांचे नेटवर्थ असलेल्या द कुटे ग्रुपचे चेअरमन सुरेश कुटे आतापर्यंत राजकारणापासून कोसो दुर होते. मात्र, मधल्या काळात त्यांच्या समूहाची केंद्रीय आयकर विभागाने नियमित तपासणी केल्यानंतर ते अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून ठेवी काढण्यासाठी झुंबड उडाली होती.

Suresh Kute Joined BJP
Vivek Kolhe : ''आरे ला, कारे करून उत्तर देण्यास तयार''; विवेक कोल्हेंचा विरोधकांना इशारा!

आजही या मल्टिस्टेटची आर्थिक घडी बसलेली नाही. मात्र, याच वेळी त्यांच्या प्रवेशाची चर्चा होत होती. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि त्यांच्या ग्रुपमध्ये साडेचार हजार कोटी रुपये गुंतविणारा भागीदार मिळणे हादेखील योगायोग ठरला आहे. त्यातून या ठेवीदरांचे पैसे देणार असल्याचे त्यांनी कालच जाहीर केले.

Suresh Kute Joined BJP
Jarange-Patil News : जरांगे-पाटील शब्दाचेही पक्के : मायणीकरांना दिलेला शब्द पाळला...

दरम्यान, त्यांच्या द कुटे ग्रुपमुळे जिल्ह्याचाही लौकिक झाला तसेच हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. दीपावलीनंतर सुरेश कुटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेशाची चर्चा असताना त्यांनी अचानक नागपूरमध्ये छोटेखाली कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेशाच्या घाईमुळेही राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com