MadhukarRaje Ardad News : मराठवाडा विभागाचे निवृत्त विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आता राजकारणाची इनिंग सुरू करणार!

Retired Divisional Commissioner MadhukarRaje Ardad : विभागीय आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मधुकरराजे आर्दड यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Madhukar Raje Ardad
Madhukar Raje ArdadSarkarnama
Published on
Updated on

MadhukarRaje Ardad and Vidhansabha Election 2024 : प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवेत काम केल्यानंतर या कामाचा, प्रशासनाचा अनुभव सर्वसामान्य लोकांसाठी करता यावा यासाठी अनेक उच्चपदस्थ सेवानिवृत्त अधिकारी आपली सेंकड इनिंग राजकारणातून सुरू करु पाहतात.

अनेकांनी हा मार्ग निवडला आणि त्यावरून यशस्वी वाटचाल केल्याची उदाहरणे देखील आहेत. याच यादीत आता आणखी एक नाव जोडू पाहत आहे, ते म्हणजे नुकतेच मराठवाडा विभागाचे निवृत्त झालेले विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड.

प्रशासकीय सेवेत असल्यापासूनच त्यांना राजकीय क्षेत्र खुणावत होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले होते. परंतु तेव्हा काही कारणामुळे मधुकरराजे आर्दड(MadhukarRaje) यांना उमेदवारी मिळाली नाही. आता विभागीय आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मधुकरराजे आर्दड यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाशी केलेल्या विशेष संवादामध्ये आर्दड यांनी आपण आपली दुसरी इनिंग राजकारणापासून सुरू करू पाहत आहोत. घनसावंगी विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे मधुकर राजे आर्दड यांनी सांगितले.

Madhukar Raje Ardad
Manoj Jarange Emotional : हिंगोलीत मनोज जरांगे भावूक; मराठा समाजाला केलं मोठं आवाहन, म्हणाले...

प्रशासकीय सेवेत काम करतांना वरिष्ठ अधिकारी म्हणून जे प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान आम्हाला जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून दिले जाते. ज्या सोयीसुविधा, शासकीय पगार आम्ही या कराच्या पैशातून घेतो त्या माध्यमातून मिळालेले ज्ञान याचा खऱ्या अर्थाने उपयोग समाजातील शेवटच्या घटकाला झाला पाहिजे. तो पोहचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून मी राजकारणाकडे पाहतो.

उच्च पदावर काम करणारे आणि प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होणारे अनेक अधिकारी सांगतात एक आणि करतात दुसरेच. पण मी सेवानिवृत्ती नंतर राजकारणात जाऊन लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टीने मी वाटचाल सुरू केली आहे. मराठा आरक्षण विषयाच्या अनुषंगाने माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याशी चांगला संपर्क आला.

Madhukar Raje Ardad
Maratha Reservation News : अशोक चव्हाण यांच्यावर भाजपचा विश्वास, म्हणूनच दोनवेळा जरांगेंच्या भेटीला पाठवले!

खरतर गेल्या लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले होते. ज्या भागात मी जन्मलो, वाढलो, शिक्षण घेतले त्या भागात काम करण्याची माझी इच्छा होती. शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतांना काही कारणामुळे तेव्हा ते शक्य झाले नाही.

Sarkarnama

पण सेवानिवृत्तीनंतर राजकारणात उच्चशिक्षित, प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे याचा लाभ खऱ्या अर्थाने जनतेला व्हावा या हेतूने मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महायुती-महाविकास आघाडी पाहता काय होईल? माझ्या प्रयत्नांना किती यश येईल? यावर सगळे अवलंबून आहे.

मी शिवसेनेकडून(Shivsena) घनसावंगी मतदारसंघातून लढण्यास इच्छूक आहे, उमेदवारी संदर्भात माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे सुरू असल्याचेही मधुकरराजे आर्दड यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com