Maratha Reservation News : अशोक चव्हाण यांच्यावर भाजपचा विश्वास, म्हणूनच दोनवेळा जरांगेंच्या भेटीला पाठवले!

BJP MP Ashok Chavan Met Manoj Jarange Patil : भाजपचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले त्याला मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये असलेली नाराजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी...
devendra fadnavis manoj jarange patil ashok chavan
devendra fadnavis manoj jarange patil ashok chavansarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यावर भाजपचा जास्तच विश्वास असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेले आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण (Ashok Chavan) दोनवेळा अंतरवाली सराटी येथे जाऊन आले.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका आहे, यावर चर्चा केल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला.

भाजपचे (BJP) दिग्गज उमेदवार पराभूत झाले त्याला मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये असलेली नाराजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काल अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट महत्वाची ठरते.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीही चव्हाण यांनी मध्यरात्री अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांची ही दुसरी भेट आहे. चव्हाण यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे हे होते. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि त्या सोडवण्यासाठी राज्य व केंद्रीय पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची चर्चा या भेटीत झाल्याचे बोलले जाते.

devendra fadnavis manoj jarange patil ashok chavan
Pune Crime : पुण्यात चाललंय तरी काय? पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितली आपबिती...

आंदोलना दरम्यान जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येणारे सरकारचे शिष्टमंडळ हा स्वतंत्र भाग झाला. पण सरकारने आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणाचा अभ्यास असणाऱ्या बहुजन नेत्याच्या मार्फत वन टू वन चर्चा सुरू केल्याचे दिसत आहे. 13 जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठी दिलेली मदुत संपत आल्यानंतर सरकारने आता वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्याशी घेतलेली भेट असल्याची चर्चा आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. तत्कालीन भाजप सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्याची मोठी जबाबदारी उपसमितीचे अध्यक्ष आणि सरकारमधील महत्वाचे मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांच्यावर होती. त्यामुळे चव्हाण यांचा या विषयावर चांगला अभ्यास आहे. अशोक चव्हाण आता सत्ताधारी भाजपमध्ये आहेत.

devendra fadnavis manoj jarange patil ashok chavan
Manoj Jarange : अशोक चव्हाण अन् संदीपान भुमरे तातडीने मनोज जरांगेंच्या भेटीला

राज्यसभेवर खासदार असल्याने केंद्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काही मार्ग काढता येतो का? यासाठीही राज्य सरकार, मराठा आंदोलक यांच्यामधील दुआ म्हणून काम करताना दिसत आहेत. भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर या निमित्ताने मराठा समाजाशी संवाद साधण्याची मोठी जबाबदारी सोपवल्याचे बोलले जाते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये असलेल्या रोषाचा फटका अशोक चव्हाण यांना त्यांच्या नांदेड जिल्ह्यामध्ये बसला होता.

लोकसभा निवडणुकी दरम्यान अनेक ठिकाणी त्यांना अडविण्यात आले होते. त्यानंतर भाजपने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्यात यशस्वी ठरते का? त्या अशोक चव्हाण यांची भूमिका किती महत्वाची ठरते हे पाहावे लागेल.

devendra fadnavis manoj jarange patil ashok chavan
Uddhav Thackeray Vs Sanjay Shirsat : भाजपचा खांदा वापरणार, संजय शिरसाटांची शिकार करणार? उद्धव ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com