Mahadev Jankar Vs Rajesh Vitekar : जानकरांचा परभणीवर डोळा; अजितदादांच्या शिलेदाराच्या पोटात गोळा...

Parbhani Loksabha Constituency : महायुतीत अजित पवारांनी परभणी राष्ट्रवादीकडे ठेवण्यासाठी आग्रह धरला. त्यातून राजेश विटेकरांनी जोरदार तयारी केली होती.
Mahadev Jankar, Rajesh Vitekar
Mahadev Jankar, Rajesh VitekarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Polical News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले असून महायुतीच्या जागावाटपात त्यांना एक जागा देण्याचे निश्चित आहे. जानकरांनी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी केली होती. त्यापैकी माढा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. परिणामी जानकर परभणीमधून लढण्याची दाट शक्यता आहे. मात्र यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे विश्वासू राजेश विटेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या केलेल्या परभणी मतदारसंघावरील दाव्यावर संकट निर्माण झाले आहे. Mahadev Jankar Vs Rajesh Vitekar

Mahadev Jankar, Rajesh Vitekar
Madha Lok Sabha News: जानकरांचा ‘यू टर्न’, माढ्यावर अभयसिंह जगतापांचा दावा; आघाडीत नवा ट्विस्ट

महायुतीच्या जागावाटपात परभणीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) परभणी राष्ट्रवादीकडे असावा यासाठी सुरुवातीपासूनच आग्रह धरला होता. येथून राष्ट्रवादीतील राजेश विटेकरांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपच्या नेतृत्वाकडूनही अशाच प्रकारचे संकेत देण्यात येत होते. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या गोटातही शांतता दिसून येत होती. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. यंदाही विटेकरांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणीत विशेष दौरेही केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar, Rajesh Vitekar
Mahadev Jankar News : जानकर यांचे दबावतंत्र यशस्वी, महायुतीकडून अखेर मनधरणी...

परभणीतून मराठा समाजात विटेकर (Rajesh Vitekar) यांच्याविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे जिंकून येणाच्या पूर्ण विश्वास असलेल्या विटेकरांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणाच बाकी होती. दुसरीकडे रासपचे महादेव जानकर यांनी बीड येथील ओबीसी मेळाव्यात सर्वात प्रथम परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. पक्षाकडून बूथ स्तरावर तयारीही करण्यात आली आहे. मात्र रविवारी झालेल्या बैठकीनंतर अचानकच जानकर यांनी महायुतीमध्येच असल्याचे जाहीर केले.

महायुतीच्या जागावाटपात जानकर (Mahadev Jankar) यांना एक जागा देण्यात येणार आहे. ही जागा कोणती असेल हे जाहीर केले नसले तरी ते परभणीमधून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण जानकर यांनी तयारी केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांची आधीच उमेदवारी जाहीर केलेली आहे.

महायुतीकडून परभणी मतदारसंघात महादेव जानकरांना उमेदवारी मिळाली तर राजेश विटेकर यांच्या तयारीवर पाणी फिरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटेकर यांच्यासाठी खास आग्रह धरलेल्या परभणी मतदारसंघासाठी उमेदवारीची बाजी कोण मारतो, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mahadev Jankar, Rajesh Vitekar
Ashok Chavan-Madhav Kinhalkar : कट्टर विरोधक अशोक चव्हाण - किन्हाळकर तब्बल 25 वर्षांनी एकाच व्यासपीठावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com