Mahadev Jankar News : 'मला पैशांची कमी नाही, आय एम अ लँडलॉर्ड' ; जानकरांच्या विधानाची एकच चर्चा...

Lok Sabha Election 2024 : थोरले भाऊच पंतप्रधान आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी माझे संबंध आहेत. या चौघांच्या मी पाया पडून परभणीचा विकास करेन.
Mahadev Jankar News
Mahadev Jankar NewsSarkarnama

Lok Sabha Election 2024 : परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक चर्चेची आहे. कारण या ठिकाणी दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव खासदार राहिले आहेत. आता ते तिसऱ्या वेळी खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, या वेळी त्यांच्याकडे धनुष्यबाण नसून मशाल हे निवडणूक चिन्ह आहे, तर दुसरीकडे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर रिंगणात आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा परभणीत पार पडली. दरम्यान, आता महादेव जानकर यांनी मोदींच्या पाया पडून मी मतदारसंघात विकासाची गंगा आणीन, असे 'सकाळ'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. (Latest Marathi News)

महादेव जानकर म्हणाले, "जनतेने मला खासदार केलं तर परभणीला विकासाच्या दृष्टीने एक देशात नंबरवर नेण्याचा प्रयत्न करीन. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. जपानची टेक्नॉलाॅजी मी इथे आणणार आहे. शेती, उद्योग, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात विकास घडवून आणीन. पायाभूत सुविधांवर भर देणार आहे. कापूस हब मी इथे निर्माण करणार. शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग आणण्याचा प्रयत्न करीन."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar News
Sanjay Jadhav News : "परभणीचे मोदी आम्हीच, 26 एप्रिलनंतर जानकर रेल्वे स्टेशनवर झोपणार, तर गुट्टे...", जाधवांचा हल्लाबोल

जानकर म्हणाले, "मला आता पैशांची कमी नाही. आय एम अ लँडलॉर्ड. कारण आमचे थोरले भाऊच पंतप्रधान (Narendra Modi) आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी माझे संबंध आहेत. या चौघांच्या मी पाया पडून परभणीचा विकास करेन. जो मागासलेपणा आहे, ते दूर करण्याचा प्रयत्न करेन."

Mahadev Jankar News
Abu Azmi on the way to NCP : सपाला मुंबईत धक्का; अबू आझमी अजितदादांना ताकद देणार ?
Mahadev Jankar News
Abu Azmi on the way to NCP : सपाला मुंबईत धक्का; अबू आझमी अजितदादांना ताकद देणार ?

परभणीत तिरंगी लढत -

परभणीत महायुतीचे महादेव जानकर, महाविकास आघाडीचे संजय जाधव(Sanjay Jadhav) आणि वंचितचे पंजाबराव डख यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. महादेव जानकर यांनी आधी माढा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक त्यांनी आपला मोर्चा परभणीकडे वळवला. महायुतीतील राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून जानकरांना (Mahadev Jankar) जागा दिली आणि साताऱ्याचे जानकर परभणीचे उमेदवार झाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com