Mahadev Jankar News : मराठा आरक्षण मिळावे यासाठी रात्री न्यायाधीशांची भेट घेतली होती; जानकरांनी सांगितली आठवण!

Lok Sabha Election 2024 : पाच - सहा वेळा काही मराठा तरुण माझ्या गाडीपुढे येऊन घोषणा देत होते. मी म्हणालो, या बसा. मी त्यांची समजूत काढल्यानंतर ते म्हणाले, साहेब तुम्हीच आम्हाला आरक्षण देऊ शकता.
Mahadev Jankar News
Mahadev Jankar NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. कारण या ठिकाणी दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव खासदार राहिले आहेत. आता ते तिसऱ्या वेळी खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, या वेळी त्यांच्याकडे धनुष्यबाण नसून मशाल हे निवडणूक चिन्ह आहे, तर दुसरीकडे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर रिंगणात आहेत.

या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिल्याचे चित्र दिसून येत होते. स्वत: जानकर यांनी मान्य केले की, मतदारसंघात काही अंशी मराठा आणि ओबीसी असा प्रचाराचा मु्द्दा करण्यात येत आहे. जानकर यांनी 'सरकानामा'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'ते मराठा समाजासाठी आग्रही आहेत. आपणही मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं, यासाठी मंत्री असताना प्रयत्न केले.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महादेव जानकर यांनी 'सरकारनामा'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना मराठा विरुद्ध ओबीसी लढाईच्या मुद्द्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'ज्या मराठवाड्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला. त्याच मराठवाड्यात तुमचा परभणी हा लोकसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे मराठा आणि ओबीसी हा ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे, यामुळे निवडणुकीत तुम्हाला काही अडचण निर्माण होईल का? असा प्रश्न 'सरकारनामा'च्या वतीने जानकरांना विचारण्यात आला.

Mahadev Jankar News
Parbhani Loksabha Constituency : परभणी भाजपमध्ये चाललंय काय, बोर्डीकरांना टाळून बैठक?

या प्रश्नावर जानकर म्हणाले, "अंतरवाली सराटी हे गाव माझ्याच लोकसभा मतदारसंघात म्हणजे परभणीत आहे. या देशात पहिलं आरक्षण छत्रपती शाहू महाराज यांनी दिलं. त्याचं घटनेत रूपांतर करण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एखाद्या जातीला आरक्षणात घालणं किंवा काढणं आमचं काम नसतं. यासाठी दोन तृतीयांश बहुमत संसदेत लागतं."

Mahadev Jankar News
Madha Lok Sabha 2024 : फडणवीस, पवारांना भेटलेले जानकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार की स्वतंत्र अस्तित्व ठेवणार?

जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, "आता मुद्दा काढला जातो की महायुती सरकारने दिलेलं 10 टक्के आरक्षण टिकेल का? आम्ही दिल्लीत बसलोय ना. माझ्या सातारचाच मोरे नावाचा एक न्यायाधीश होता. त्यावेळी मी राज्यात मंत्री होतो. माझ्या गावचे म्हणजे निमसूडचे ते होते. त्यावेळी आम्ही त्यांना रात्रीचं भेटायला गेलो होतो. तेव्हा मराठा आरक्षणासाठी आम्ही जीआर काढला होता. आम्ही न्यायाधीश मोरेंना म्हणालो की, मराठ्यांमध्ये दोन टक्के लोकं सुधारलेली आहेत. 98 टक्के लोकं मागास आहेत. त्यांना जमीन नाही. मुलांची लग्न होत नाहीत. त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. तेव्हा तो मुद्दा पास झाला.

Mahadev Jankar News
Parbhani Lok Sabha News : मराठा-ओबीसी संघर्षावर महादेव जानकर म्हणतात, "मराठा तरुणांना माझं एकच सांगणं..."

"आज मराठा समाजातील (Maratha Reservation) काही तरुण आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष चाललेला आहे. पण आम्ही त्यांना समजावतो. असे तरुण माझ्याकडे आले तर त्यांच्याशी मी संवाद साधतो. तेव्हा ते माझे समर्थक बनतात. मला आता अनुभव येतोच आहे. पाच - सहा वेळा काही तरुण माझ्या गाडीपुढे येऊन घोषणा देत होते. मी म्हणालो, या बसा. मी त्यांची समजूत काढल्यानंतर ते म्हणाले, साहेब तुम्हीच आम्हाला आरक्षण देऊ शकता. जे विरोध करतात त्यांना मी सांगितलं की, मराठा -धनगर आणि माळी एकाच आईची लेकरं आहेत, असं गुलामगिरीत महात्मा फुलेंनी लिहिलं आहे, असे जानकर म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com