Beed News : अठरा महिन्यापुर्वी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला होता. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी त्यांची पत्नी व कुटुंब पोलीसांकडे खेट्या घालत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड यानेच आपल्या गुंडाकडून महादेव मुंडे यांचा खून केला होता, असा आरोप कराड याचा जुना सहकारी असलेल्या विजयसिंह उर्फ बाळा बांगर याने जाहीर पत्रकार परिषद घेऊन केला होता.
दरम्यान, बांगर यांनी केलेल्या आरोपानंतर पोलीसांनी त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधिक्षक नवनीत कावँत यांच्याकडे केली होती. (Beed News) तसेच आठवडा भरात आरोपींना अटक केले नाही तर आपण टोकाचे पाऊल उचलू असा इशारी दिला होता. त्यानूसार आज ज्ञानेश्वर मुंडे व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीसांनी सतर्क राहून पेट्रोलच्या सोबत आणलेल्या बाटल्या हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु नंतर माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकूणच अठरा महिने उलटून गेले तरी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत, त्यांना अटक होत नाही यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या घरातील इतर सदस्यांचा संयम सुटत चालला आहे. यातूनच त्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Crime News) ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुटुंबासमवेत पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर दोन पेट्रोलच्या बाटल्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी त्या जप्त केल्या असून यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी मुंडे आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली.
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची अठरा महिन्यापुर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मात्र अद्याप यातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. शिवाय या प्रकरणाची चौकशीही संथ गतीने सुरू आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी पोलीसांकडे जाऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांचा खून वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरूनच झाला. कराडने महादेव बांगर यांचे रक्त, मासाचे तुकडे पुरावा म्हणून टेबलवर ठेवले होते. हा खून करणाऱ्या गुंडांना गाड्या गिफ्ट दिल्या होत्या, असा आरोपही केला होता. त्यानंतर बाळा बांगर यांचा जबाब नोंदवून घेत आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी काही दिवसापुर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती.
बाळा बागंर यांचा पोलीसांनी जबाब नोंदवून घेतल्यानंतर दोन दहा दिवस उलटून गेले तरी कुठलीच कारवाई पोलीसांकडून होत नसल्याने अखेर आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधिकक्ष कार्यलयाबाहेर आई, वडील आणि मुलांना घेऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.