Beed Politics : बीड जिल्ह्यात 'मविआ'चा 2 तर महायुतीचा 3 मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ संपेना

Beed District Mahayuti And Mahavikas Aghadi Politics : आघाडीचे परळी व माजलगाव तसेच महायुतीचे आष्टी, गेवराई व बीडच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटला नाही. त्यामुळे मातब्बर मुंबईतच तळ ठोकून आहेत. भाजपने केजमधून नमिता मुंदडा तर राष्ट्रवादीने परळीतून धनंजय मुंडे व माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्या नावांची घोषणा केली आहे.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Mahavikas Aghadi Vs Mahayuti Sarkarnama
Published on
Updated on

Beed News, 27 Oct : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुतीत भाजपने केज तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) परळी व माजलगाव मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेवराई.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केज, आष्टीनंतर बीडच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, आघाडीचे परळी व माजलगाव तसेच महायुतीचे आष्टी, गेवराई व बीडच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटला नाही. त्यामुळे मातब्बर मुंबईतच तळ ठोकून आहेत.

महायुतीत (Mahayuti) भाजपने केजमधून नमिता मुंदडा तर राष्ट्रवादी काँग्रेसने परळीतून पालकमंत्री धनंजय मुंडे व माजलगावमधून आमदार प्रकाश सोळंके यांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, आघाडीत शिवसेना ठाकरेंकडून गेवराईतून माजी मंत्री बदामराव पंडित.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आष्टीतून युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, केजमधून माजी आमदार पृथवीरा साठे, बीडमधून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : शिवसेनेची दुसरी अन् काँग्रेसची चौथी उमेदवारी यादी जाहीर!

आघाडीचे (Mahavikas Aghadi) माजलगाव आणि परळीच्या उमेदवारांबाबत अद्यापही मुंबईत खल सुरु आहे. पक्षात प्रवेश केलेले रमेशराव आडसकर माजलगावमधून प्रमुख दावेदार मानले जातात. तर, परळीतून माजी आमदार संजय दौंड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राजाभाऊ फड तसेच सुनील गुट्टे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, शनिवारी उशिरापर्यंत या दोन्ही मतदार संघांतील उमेदवारांची घोषणा झाली नाही.

इकडे महायुतीत देखील तीन मतदार संघांचा तिढा कायमच आहे. आष्टीची जागा भाजपला सोडून त्या बदल्यात गेवराईची जागा राष्ट्रवादीला सोडण्याबाबत चर्चा असली तरी पेच कायमच आहे. आष्टीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह याच मतदार संघातील भाजपचे माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भिमराव धोंडे देखील उमेदवारीबाबत आस लावून बसले आहेत.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Congress Third list of candidates : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; जाणून घ्या, किती उमेदवारांना दिली संधी?

आष्टीत युतीत आमदार असल्याने बाळासाहेब आजबे यांना उमेदवारीचा विश्वास आहे. सुरुवातीपासून गेवराईच्या बदल्यात सुरेश धसांसाठी आष्टीची जागा भाजपला सोडण्याबाबत चर्चा होती. मात्र, मुंडे भावंडांचा कल नेमका कोणाला हे महत्वाचे आहे. त्यातच भीमराव धोंडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता आणखीच संभ्रम वाढला आहे.

त्यामुळेच गेवराईच्या भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी पक्षाचा राजीनामा देऊन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयसिंह पंडित यांचे नाव जाहीर केलेलं नाही. तर, बीडची जागा देखील शिवसेनेला की राष्ट्रवादी काँग्रेसला याचा तिढा देखील सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, युवा सेनेचे बाजीराव चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर, फारुख पटेल, तय्यब शेख वेटिंगवरच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com