Chhatrapati SambhajiNagar : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानात महायुतीकडून हिंदुत्वाचा मुद्दा अधिकच पेटवला गेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कालीचरण महाराज यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर जहाल भाषण केले. महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारसभेत कालीचरण महाराज सहभागी झाले होते.
"केंद्र सरकार आणत असलेल्या वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा आणावी, यासाठी मुस्लिमांनी काँग्रेस अॅण्ड कंपनीकडे मागणी केली आहे. पण हा हिंदुस्थान आहे. इथं हिंदूच स्थान आहे", असे विधान कालीचरण महाराज यांनी या प्रचार रॅलीत केले.
कालीचरण महाराज यांनी सुरवातीपासून आक्रमक भाषण केले. हिंदू व्होट (Vote) बँकांची क्रांती पाहिजे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असे विधान केले. यानंतर त्यांनी त्यांच्या स्फोटक भाषणाचा धडाका सुरू ठेवला. हिंदू मतदानाला जात नाही, त्यामुळे मुस्लिम धार्जिणे लोक राजा बनू लागलेत. मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते मतदानात सहभागी होतात. याशिवाय मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात, यावर कालीचरण महाराज यांनी घणाघात केला.
सर्वच आमदार-खासदार मुस्लिमांना खुश ठेवण्यासाठी त्यांचे तळवे चाटतात. लाडकी बहाणी योजना, रोजगार देऊ, असे सांगून खुश ठेवतात. फुकटात काहीतरी तुकडे टाकायचे, असे सर्वच राजकीय पक्ष करतात. फुटकात वापरणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम आहेत, असे गंभीर विधान कालीचरण महाराज यांनी लगावला.
'कातडी सोलली जात आहे, ती हिंदूंची (Hindu), असे सांगून अहिंसा संभव नाही. हिंसा करावीच लागणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले. हिंदू मतदान करतील, तर हिंदू कट्टर राजा बसेल, असं विधानही कालीचरण महाराज यांनी केले. हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे. 100 टक्के दंगली मुसलमानांकडूनच होतात', असा दावाही कालीचरण महाराज यांनी यावेळी केला.
कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर नाव न घेता टीका केली. यावेळी त्यांनी वेगवेगळे शब्दप्रयोग वापरले. आता एक आंदोलन हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी झालं. लाखो लोक मुंबईत आले. काही जातीपातीसाठी आरक्षणसाठी नाही तर ,फक्त हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी घणाघाती टीका कालीचरण महाराजांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.