Eknath Shinde News : शरद पवारांवर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी कामातून...' पाहा VIDEO

CM Eknath Shinde And Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांवर टीका करत नाही, यावर शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर टीका करताना दिसले नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यावर दबक्या आवाजात यावर चर्चा असून, निवडणुकीनंतर आघाडी होणार, असे देखील म्हटले जात आहे.

शरद पवारांवर टीका न करण्यामागचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'सकाळ माध्यम समूह'च्या साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगून टाकले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'सकाळ माध्यम समूह'च्या साम टीव्ही चॅनलसाठी 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांनी मुलाखत घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आपण टीका करताना दिसत नाही, तसेच शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची आघाडी होणार का, असा प्रश्न केला होता.

Eknath Shinde News
Balasaheb Thackeray Memorial Day : मोदींच्या चॅलेंजला राहुल गांधीचं उत्तर; बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून पंतप्रधानांना केलं निरुत्तर

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "मी कोणावरही टीका करत नाही. माझ्यावर टीका करतो, त्याला मी कामातून उत्तर देतो. खालच्या पातळीवर आरोप केले माझ्यावर, पण मी कधीही त्यांना उत्तर दिले नाही. मी काम करत राहिलो".

Eknath Shinde News
Aditya Thackeray : 'गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढताना दिसतात'; आदित्य ठाकरेंचा आमदारांच्या बंडखोरीवर मोठा गौप्यस्फोट

'लोक म्हणतात, की कितीही आरोप केले, तरी हा विचलीत होत नाही. त्याचेच त्यांना टेन्शन आहे. मी विचलित होत नाही, काम करतो, योजना राबवतो, जनता खूश आहे. विरोधक काय बोलतात, याच्याशी आम्हाला काही देणघेण नाही. जनता काय बोलते याला आम्ही महत्त्व देतो', असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर महायुती खूप आक्रमक दिसते. त्यातुलनेत महाविकास आघाडीने मुलभूत प्रश्नांवर अधिक भर दिलेला दिसतो. दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी यंदाच्या निवडणुकीत टीकेबाबत संयम बाळगलेला दिसत असला, तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र पातळी सोडल्याचे दिसले. यामुळे स्थानिक पातळीवर राजकारण चांगलेच तापले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करताना दिसत नाही. यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची आघाडी होणार, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com