
Dhananjay Munde : महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मात्र, या खातेवाटपानंतर एका मंत्र्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची.
धनंजय मुंडे यांचे बीड (Beed) जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या वाल्किम कराड याच्याशी मुंडेंचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये, त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करू नये, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती.
जोपर्यंत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ नये, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, सर्वांचा विरोध डावलून अजित पवारांनी मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.
यानंतर धनंजय मुंडेंनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, "राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब (Ajit Pawar), आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय खा.प्रफुल्ल भाई पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो.
राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन." दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.22) मस्साजोग गावाला भेट देत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांसमोर या गावातील ग्रामस्थांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रीपद देऊ नका तसंच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी घोषणाबाजी केली होती.
मात्र, त्याच दिवशी रात्री मंत्रिमंडळाचं खातेपाटप जाहीर झालं. यामध्ये मुंडे यांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे विरोधकांचा विरोध झुगारून महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यामुळेच मुंडे यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय सध्या मुंडे यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.