Tanaji Sawant News : आता तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडीही देतील! भाजपवर प्रहार करताना तानाजी सावंतांना राहिले नाही भान अन्...

Maharashtra election news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह विरोधकांनी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सांवत यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नाहीये. पाहिजे तेवढे पैसे माझ्याकडून घेऊन जा, पण जिल्हा परिषदेत गद्दारी करू नका, असे सांगत खळबळ उडवून दिल्यानंतर आता भाजपवर टीका करताना तानाजी सावंत पुन्हा घसरल्याचे पहायला मिळाले.

तुळजापूरचे भाजपचे नगराध्यक्ष हे ड्रग्ज पेडलर आहेत. इथल्या जनतेने त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे आता तुळजाभवानी मातेचा प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी देतील, असे वादग्रस्त विधान तानाजी सांवत यांनी केले. तुळजापूर नगरपालिकेची निवडणुक आणि भाजपने उमेदवारी दिलेले विनोद गंगणे याची चर्चा राज्यभरात झाली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह विरोधकांनी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली कशी? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. निवडणूक प्रचारातूनही भाजप आणि राणा पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप टीका झाली.

Tanaji Sawant
Police Recruitment : पोलीस भरतीसाठी वयात तीन वर्षांची सवलत; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, निवडणुकीआधी 'यूपी'त धमाका

तुळजापूरच्या मतदारांनी मात्र नगराध्यक्ष पदासह नगरपालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिली. विनोद गंगणे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. आज याच नगराध्यक्ष गंगणे व भाजपवर टीका करतांना शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केलं आहे, त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडीही देतील, असा टोला त्यांनी लगावला.

तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे. त्याचं पावित्र्य आपण राखायला हवं. धाराशिव नगरपरिषदेत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार म्हणत तानाजी सावंत यांनी मित्रपक्षाला इशारा दिला. भूम परंडा मतदारसंघात आणलेला निधी एकत्र करा आणि मी आणलेल्या निधीपेक्षा इतरांचा निधी जास्त असेल तर राजीनामा देतो, असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिले.

Tanaji Sawant
Supreme Court : SC, ST, OBC प्रवर्गाला सर्वात मोठा दिलासा; भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

काम करूनही दीड हजार मतांनी निवडून येतो. ही शोकांतिका आहे, असे म्हणत तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या निसटत्या विजयाबद्दलही नाराजी व्यक्त केली. गद्दारी केली तर ठेचून काढणार, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी पक्षाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली. दिवसा पक्षाचं नाव घ्यायचं आणि रात्री फितुरी करणाऱ्यांना आम्ही मानत नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com