Police Recruitment : पोलीस भरतीसाठी वयात तीन वर्षांची सवलत; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, निवडणुकीआधी 'यूपी'त धमाका

UP Police Recruitment : उत्तर प्रदेश सरकारकडून वयोमर्यादेत थेट वर्षांच्या सवलतीची मोठी घोषणा केली आहे. राज्यात सुरू असलेल्या ३२ हजार ६७९ पदांसाठीच्या पोलीस भरतीसाठी ही सवलत असणार आहे.
Police Recruitment
Police RecruitmentSarkarnama
Published on
Updated on

Recruitment News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कंबाईन ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षेची तयार करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यात मागील आठवड्यात आंदोलन केले. परीक्षेची जाहिरात उशिरा आल्याने वयोमर्यादा वाढविण्याची या विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यासाठी विरोधकांनी जोर लावला होता. पण ना राज्य सरकार, ना आयोगाने या मागणीचा विचार केला. रविवारी ही परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांचे आंदोलन व्यर्थ ठरले.

महाराष्ट्राप्रमाणेच भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातही पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीने जोर धरला होता. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षासह अन्य विरोधी पक्षांनीही विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे वय वाढविण्याची मागणी केली जात होती. अखेर योगींनीही ही मागणी मान्य केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडून वयोमर्यादेत थेट वर्षांच्या सवलतीची मोठी घोषणा केली आहे. राज्यात सुरू असलेल्या ३२ हजार ६७९ पदांसाठीच्या पोलीस भरतीसाठी ही सवलत असणार आहे. त्यामुळे हजारो युवक या भरतीसाठी आता पात्र ठरणार आहेत. ही भरती प्रक्रिया थेट होणार आहे. त्यामुळे या युवकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Police Recruitment
Mahapalika Election : भाजपवर अभूतपूर्व नामुष्की; 'कमळा'च्याच पराभवासाठी लावावी लागली फिल्डींग, अपक्षाला पाठिंबा, काय घडलं?

सरकारने सर्व प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली आहे. यूपी सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्यासह भाजप आमदारांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणी केली होती.

Police Recruitment
Maharashtra Government : नार्वेकरांच्या संरक्षण काढण्याच्या आदेशावरून वाद पेटलेला असतानाच सरकारकडून मोठा निर्णय; 'त्या' उच्चस्तरीय समितीत बदल...

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेची जय्यत तयारी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस भरतीही होत आहे. त्यातच आता वयोमर्यादा वाढवत योगींनी हजारो युवकांची मागणी मान्य केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com