Ration Card News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड, पुरवठा विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल!

yellow ration card fraud maharashtra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड तयार केल्याचा प्रकार उघड झाला. पुरवठा विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Ration Card News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड, पुरवठा विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल!
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Crime News : रमाई अवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 12 मार्च रोजी खळबळ उडवून दिली होती. काही माजी व विद्यमान सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि थेट ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे नाव या घोटाळ्यात घेतले गेल्याने याची चर्चा राज्यस्तरावर झाली. विशेष म्हणजे या घोटाळ्याचे पुरावे सादर करताना इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व कुटुंबियांच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचेही दाखवले होते.

या प्रकाराने शासकीय यंत्रणाही हलली होती, पुरवठा विभागाने यांची गंभीर दखल घेत रीतसर सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारतीय वाकोडे यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती. इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड दाखवत त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहणार आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर, पत्नी लता, मुलगा श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश अशी नावे असल्याचे सांगितले होते.

Ration Card News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड, पुरवठा विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल!
Ambadas Danve News: कापून टाकू, फाडून टाकू म्हणत अंबादास दानवेंना धमकी देणारा निघाला भाजप कार्यकर्ता!

विशेष म्हणजे या शिधापत्रिकेवर सक्षम अधिकाऱ्यांचा शिक्का स्वाक्षरी होती. 13 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी गुन्हा दाखल करण्याची सूचित केले होते. शिधापत्रिकेचे शहानिशा केली असता शासकीय योजनेतील अपहारा संदर्भात प्राथमिक गोष्टी समोर आल्या. महत्त्वाचे म्हणजे हे शिधापत्रिका हस्तलिखित होती. परंतु मागील दोन वर्षापासून शासनातर्फे ऑनलाइन शिधापत्रिका देण्यात येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रमाई घरकुल योजनेच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट (जातीचे दाखले) तयार करून योजनेचा पैसा लाटण्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Ration Card News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड, पुरवठा विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल!
गॅस सबसिडी हवीये? मग e-KYC बद्दलचे हे नवीन नियम जाणून घ्या, बसू शकतो फटका!

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने चक्क 'महार' जातीचे दाखले काढण्यात आले. तर एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट रेशन कार्ड बनवून त्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. याच नावांनी बनावट आधार कार्ड तयार करून घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यात आले आहेत, असा दावा इम्तियाज यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com