भाजपवासी झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'काँग्रेसमध्ये मला त्रास दिला, संपवण्याचा प्रयत्न झाला'

BJP MP Ashok Chavan explosive statement against Congress : काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज खळबळ दावा केला आहे.
Congress, BJP
Congress, BJPSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्र्याने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत

  2. या नेत्याने आपल्या 14 वर्षांचा वनवास संपला असे म्हणत काँग्रेसवर टीका केली आहे

  3. तर जे काम आपण काँग्रेससाठी केले तसेच भाजपसाठी करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे म्हटलं आहे.

Latur News : कधीकाळी मराठवाड्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मानले जात होते. पण आता ते भाजपवाशी झाले आहेत. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. या दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यासह गौप्यस्फोटाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी, आता 'माझा 14 वर्षांचा वनवास संपला' असे म्हणत काँग्रेसवर आरोप केला आहे. त्यांनी टीका करताना 'मला संपवण्याचा प्रयत्न होता' असा खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. ते लातूर येथील सभेत बोलत होते.

चव्हाण यांनी यावेळी काँग्रेस तसेच विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लातूरला या अगोदर येण्याची संधी अनेकदा मिळाली. पण आजचे आमंत्रण हे अत्यंत प्रेमाने मिळाले होते. सध्याच्या घडीला राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होईल. लातूरकरांनी धक्का तंत्र वापरत आमदार रमेश कराड यांना लातूर ग्रामीणमधून निवडणून आले. लातूर जिल्ह्यातल्या सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा असल्याचे ते म्हणाले.

यावेळी काँग्रेसवर टीका करताना चव्हाण यांनी मी आयुष्यातले 14 वर्षे वनवासात होतो, पण आता माझा वनवासात संपला. या 14 वर्षात मला संपवायचा प्रयत्न झाला. राजकारणातल्या यशोशिखरावर असताना माझ्यावर आरोप झाले. 2010 मध्ये तर माझ्यावर मोठे आरोप करत मला पायउतार करण्यात आले. त्यामुळेच काँग्रेस सोडण्याचा मी निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Congress, BJP
Ashok Chavan On Heavy Rain : अतिवृष्टीने नांदेडचे अतोनात नुकसान ; रस्ते, पूल, शेती वाहून गेली, मोठ्या निधीची गरज!

भाजपमध्ये जाण्याआधी काय घडलं यावरूनही चव्हाण यांनी पडदा आता उचलला आहे. त्यांनी काँग्रेसमधील नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे पक्ष सोडण्याची तयारी केली होती. त्या पार्श्वभूमिवर मी निर्णय घेतला होता. त्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपमध्ये प्रवेश केला.

आता मी वनवासातून बाहेर पडलो आहे. त्यामुळे जे मागच्या काळात काँग्रेससाठी केलं तेच प्रयत्न भाजपसाठी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी लातूरकरांना दिले आहेत. तसेच त्यांनी लातूरकरांनी आम्हाला चांगले उमेदवार द्यावेत आम्ही त्यांना निवडून आणू असेही.

सध्या UPA ची काय अवस्था झाली आहे. त्यांचे खासदारच त्यांच्याबरोबर नाहीत. हेच कालच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी सिद्ध झाले आहे. विरोधकांची मतेही फुटली. यावरूनच हे सिद्ध होतं की विरोधात बसलेले लोकांना काहीही देऊ शकत नाही. त्यामुळेच विरोधात असणारे अनेक जण आता भाजपसोबत येत आहेत.

Congress, BJP
Ashok Chavan With Harshvardhan Sapkal : जुने सहकारी भेटल्याने आनंद झाला! पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण प्रथमच काँग्रेस नेत्यांसोबत!

FAQs :

प्र.1: अशोक चव्हाण कोण आहेत आणि सध्या कोणत्या पक्षात आहेत?
उ.1: अशोक चव्हाण हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री असून ते सध्या भाजपचे खासदार आहेत

प्र.2: अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली?
उ.2: अशोक चव्हाणांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसमधील काही लोकांनी त्यांना त्रास दिल्याने काँग्रेस सोडल्याचे म्हटलं आहे.

प्र.3: काँग्रेसवर टीका करताना चव्हाण काय म्हणाले?
उ.3: काँग्रेसवर टीका करताना चव्हाण यांनी मी आयुष्यातले 14 वर्षे वनवासात होतो, पण आता माझा वनवासात संपला असे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com