Sanjay Kenekar : अकरा महिने आमदार राहिलेल्या देवाभाऊंच्या लाडक्या संजय केनेकरांना भाजप पुन्हा संधी देणार का?

MLC Election Politics : महाराष्ट्रातील विधान परिषदेतील रिक्त 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
MLC Election Politics; Sanjay Kenekar
MLC Election Politics; Sanjay Kenekarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 12 मे रोजी मतदान होणार आहे.

  2. भाजप आमदार संजय केनेकर यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असल्याने त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबत चर्चा सुरू आहे.

  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MLC Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले विधान परिषदेतील भाजप आमदार संजय केनेकर यांचा अकरा महिन्यांचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपत आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील रिक्त 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या 12 मे रोजी या रिक्त जागांसाठी प्रत्यक्षात मतदान होणार आहे.

2025 मध्ये संजय केनेकर यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली होती. परंतु त्यांच्या वाट्याला अकरा महिन्यांचाच कालावधी आला. आता नव्याने निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष केनेकर यांना पुन्हा संधी देणार, की मग नव्या चेहरा देत धक्का देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संजय केनेकर यांनी आपल्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत थेट महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला महापालिका निवडणुकीत आव्हान दिले. तर पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिल्याचे बोलले जाते. औरंगजेबची कबर उखडून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारा, खुलताबादचे नामांतर करून ते रत्नपूर करा, अशी मागणी करत केनेकर यांनी खळबळ उडवून दिली होती.

MLC Election Politics; Sanjay Kenekar
Sanjay Kenekar: महाराष्ट्रात देवाभाऊंचं राज्य! कायदा मोडेल, त्याचं कंबरडं मोडू; संजय केणेकरांचा एमआयएमला इशारा

महानगर पालिका निवडणुकीत पक्षातील स्थानिक नेत्यांविरोधात प्रचार कार्यालयात इच्छुक उमेदवार जेव्हा आक्रमक झाले होते. तेव्हा संजय केनेकर यांनी पुढाकार घेत या सगळ्यांना शांत करत पक्षाची राज्य पातळीवर होणारी नाचक्की टाळली होती. सभागृहात काम करण्याची फार संधी केनेकर यांना मिळाली नसली तरी पक्ष पातळीवर त्यांनी आपली छाप सोडल्याचे पहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असले तरी गेल्या वर्षभरात भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या पक्षातून इनकमिंग झाले आहे. काँग्रेसमधून माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपला आपल्या कोट्यातील एक जागा प्रज्ञा सातव यांना द्यावी लागणार आहे. या शिवाय प्रादेशिक समतोल, सोशल इंजिनिअरिंगही साधावे लागणार आहे.

अशावेळी संजय केनेकर यांना पक्ष पुन्हा विधान परिषदेवर संधी देईल का? याबद्दल साशंकता आहे. नव्यानेच भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष झालेले किशोर शितोळे हे स्पर्धेत असल्याची चर्चा आहे. पक्षाचा आदेश पाळणार, देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मी कार्यकर्ता आहे हे सागणारे संजय केनेकर विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी देवाभाऊंचा आदेश पाळणार का? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

संजय केणेकर यांच्यावर महाराष्ट्राचे महामंत्री म्हणून संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नोंदणी प्रमुख म्हणूनही ते कार्यरत आहेत. 2025 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले होते आणि त्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 ला संपत आहे.

गेल्या वर्षी विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च 2025 ला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 17 या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाने संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे या तिघांची उमेदवारी जाहीर केली होती.

संजय केनेकर हे 1998 ते 2024 अशी 35 वर्ष भाजपमध्ये कार्यरत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये एक वर्ष, त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष पासून ते प्रदेशाध्यक्ष अशी १२ वर्ष, महानगरपालिकेत पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. वयाच्या 23 व्या वर्षी केनेकर यांनी उपमहापौर पद भूषवले आहे.

MLC Election Politics; Sanjay Kenekar
Sanjay Kenekar News : आमदार केनेकरांच्या कार्यालयात 'एअरगन' असलेली बॅग ठेवणारा तरुण पोलीसांच्या ताब्यात!

FAQs :

1. विधान परिषद निवडणूक कधी होणार आहे?
12 मे रोजी मतदान होणार आहे.

2. किती जागांसाठी निवडणूक होणार आहे?
एकूण 9 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.

3. संजय केनेकर यांचा कार्यकाळ कधी संपतो?
त्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत आहे.

4. केनेकरांना पुन्हा संधी मिळेल का?
याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आणि पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

5. अंतिम निर्णय कोण घेणार?
भाजप नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com