

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपचे विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी एका बॅगमध्ये एअरगन सापडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. स्वतः आमदार केनेकर यांनाही या प्रकारामुळे धक्का बसला होता. दरम्यान, पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने सुत्रं हलवली. तपासाची चक्र फिरवत आता या प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअरगन ठेवणारा तरुण पोलीसांच्या ताब्यात असून रितेश संतोष होळकर असे त्याचे नाव आहे. केनेकर यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे या आरोपीची ओळख पटवण्यात आली असून क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या तरुणाची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, परंतु त्यांने ही गन कशासाठी घेतली होती, याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
रितेश संतोष होळकर याच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. भाजप (BJP) आमदार संजय केणेकर यांचे शहरातील क्रांती चौक भागात संपर्क कार्यालय आहे. सकाळपासूनच या कार्यालयामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हे केनेकर यांना भेटायला येत असतात. त्यामुळे येथे कायम गर्दी असते. शुक्रवारी रात्री संपर्क कार्यालयातून बाहेर पडत असताना परिसरातील एका कोपऱ्यात एक बॅग पडलेली त्यांच्या कार्यालय सहाय्यकाने बघितली.
तेव्हा भेटायला आलेल्या एखाद्या नागरिकाची किंवा आपल्याच पदाधिकारी, कार्यकर्त्याची ही बॅग विसरली असावी, असे समजून आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांनीच ती कार्यालय सहाय्यकाला आत सोफ्यावर ठेवण्यास सांगितले होते. संपर्क कार्यालयातील सोफ्यावर रात्रभर ही बॅग ठेवण्यात आली. शनिवारी सकाळी जेव्हा कार्यालयीन सहायकाने ही बॅग उत्सुकतेपोटी उघडून पाहिली तर समोरच्या कप्प्यामध्ये चक्क पिस्तूल असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने याची माहिती आमदार संजय केनेकर यांना दिली. त्यानंतर ती बॅग शुक्रवारी ज्या जागेवर होती त्याच जागेवर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि काही वेळातच संजय केनेकर हे ही कार्यालयात आले. बॅगमध्ये सापडलेले पिस्तूल हे एअरगन असल्याचे समोर आले होते. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काही तासातच आरोपीला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.