Horse Trading : पक्षाशी गद्दारी केली, तर सदस्यत्व रद्द; काँग्रेसचा व्हीप, सहा वर्षे निवडणूक बंदीचाही विजय वडेट्टीवारांचा इशारा

Congress alleges massive horse-trading and cash-for-votes politics ahead Maharashtra Legislative Council local body elections : नगरसेवकांना आधी 5 लाख अॅडव्हान्स, एका मतदारसंघात 100 कोटींच्या व्यवहाराचा दावा करत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी गद्दारांना सहा वर्षांची बंदीचा इशारा दिला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

MLC election latest news : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण तापले असून, मतदारांच्या फोडाफोडीला मोठा वेग आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.

नगरसेवकांच्या मतांसाठी लाखोंची बोली लागत असल्याचा दावा करत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप- महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नगरसेवकांना सुरुवातीला पाच लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यात आले असून, आता एका मतासाठी थेट 15 लाख रुपयांपर्यंत व्यवहार होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. एका मतदारसंघात तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसचे (Congress) नगरसेवक सर्वाधिक टार्गेटवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनीही सावध भूमिका घेतली असून, मतदानासाठी काँग्रेसकडून अधिकृत व्हीप बजावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Vijay Wadettiwar
MLC election vote rate : एका मतासाठी 15 लाख? एका मतदारसंघात 100 कोटींचा धुरळा? विधान परिषद निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका करताना म्हटले की, विधान परिषद निवडणूक ही पूर्णपणे उद्योगपतींच्या पैशांवर चालणारी निवडणूक बनली आहे. नगरसेवकांची सर्रास खरेदी-विक्री सुरू असून, लोकशाहीची उघडपणे विटंबना केली जात आहे.

Vijay Wadettiwar
Latur NEET student suicide : NEET पेपरफुटीने घेतला आणखी एक जीव? लातूरमध्ये विद्यार्थिनीनं जीवन संपवलं, देशभरात संतापाची लाट

त्यांच्या मते, “एका मतासाठी 15 लाख रुपये मोजले जात असतील, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. पैशांच्या जोरावर मतं पळवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.”

काँग्रेसचा इशारा

काँग्रेसने पक्षातील संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. पक्षाचा व्हीप धुडकावून मतदान करणाऱ्यांविरोधात तात्काळ कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा स्पष्ट इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

गद्दारी केल्यास थेट कारवाई

ते म्हणाले, “जे कोणी पैशांच्या मोहापायी पक्षाशी गद्दारी करतील, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. एवढेच नाही, तर अशा लोकांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.”

‘हॉर्स ट्रेडिंग’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका जवळ येत असताना ‘हॉर्स ट्रेडिंग’, नगरसेवकांची फोडाफोडी, रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि पैशांच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी मतदारांची बांधाबांध सुरू असल्याने आगामी काही दिवसांत राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com