Satej Patil : के. पी. पाटलांनी पकडला काँग्रेसचा हात; महायुतीचा होणार ‘राधानगरी' घात 

kolhapur Politics News : राधानगरीतील बदलती समीकरणे कोणाच्या पथ्यावर
Satej Patil
Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News  : सध्या कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहिला मिळत आहे.  नुकतेच हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी भविष्यात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याचे सूतोवाच केले आहे. यामुळे राधानगरी तिला राजकीय समीकरण बदलत असून याचा फटका महायुतीला बसणार का ? आणि या समीकरणामुळे आमदार प्रकाश आबिटकर यांची भूमिका काय राहणार या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला मजबुत करण्याचे काम सध्या आमदार सतेज पाटील यांनी हाती घेतली आहे. याचा कॉग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांनी ‘बिद्री’ कारखाना निवडणुकीत घेतलेली आक्रमक भूमिका त्यानंतर के. पी. पाटील यांनी त्यांच्या सोबत राहणे पसंत केले आहे.   

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satej Patil
Jayakumar Gore : शिंदे,पवार गटाने कितीही दावा केला तरी; सातारा भाजपचाच...

भाजपच्या राहुल देसाई यांची पाटलांशी जवळीक 

दरम्यान बिद्री’ निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि सतेज पाटील हे जवळ आले आहेत. भाजप नेतृत्वाला अंगावर घेत देसाई यांनी बिद्री’ निवडणुकी सतेज पाटील यांना मदत केली आहे. ह्या दोन्ही नेत्यांनी कॉग्रेसमध्ये खूप काळ एकत्र काम केले आहे. 

 मुश्रीफ यांची ही राजकीय खेळी

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि  के. पी. पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशातच एकीकडे मुश्रीफ जाहीरपणे युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याची शपथ घेतात आणि दुसरीकडे त्यांचे सहकारी केपी पाटील हे काँग्रेसच्यां नेत्याच्या मागे राहण्याच्या घोषणा करत आहेत. त्यामुळे ‘के. पी.’ यांनी सतेज पाटील यांना साथ देण्या मागे मंत्री मुश्रीफ यांची काही राजकीय खेळी तर नाही ना अशी चर्चा सध्या सुरु आहे   

Satej Patil
Neelam Gorhe Joins Shinde Group: शिंदे गटातील प्रवेशानंतर तासाभरातच नीलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com