

Shivsena UBT News : राजकारणात कधी काय घडेल सांंगता येत नाही नुकतीच याची प्रचीती आली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते,अंबादास दानवे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आणि राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. यावर खुलासा करताना अंबादास दानवे यांनी मंत्री सामंत यांचा दावा फेटाळला आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माझ्याबद्दल जो दावा केला आहे, तो खोटा आहे. अशा चर्चा कायम होत असतात, त्या आपल्याला रोखता येत नाही. मी शिवसैनिक आहे, आजपासून नाहीतर तीन दशकांपासूनचा आणि शिवसैनिक म्हणूनच कायम राहणार आहे. पक्षाने माझ्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, आताही आहे. या जबाबदाऱ्या पेलवण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख मला देवो एवढीच माझी त्यांच्याकडे प्रार्थना आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी केलेला दावा फेटाळला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर टीका केली. शिंदेची टोळी भाजप चालवते, असा आरोप दानवे यांनी केला होता. यावर रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना सामंत'उबाठा'चे नेते अंबादास दानवे यांच्या टीकेला मीडियाने फार सिरीयस घेऊ नये, कारण लवकरच ते तुम्हाला आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे,असा दावा केला.
या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अंबादास दानवे यांनी यावर भाष्य करत मंत्री उदय सामंत यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी शिवसैनिक आहे अन् शिवसैनिकच राहणार. मी आताचा नाही तर तीन दशकापासूनचा शिवसैनिक आहे. माझ्यावर पक्षाने खूप मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आताही माझ्यावर जबाबदारी आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलवण्याची शक्ती शिवसेनाप्रमुखांनी मला द्यावी, एवढीच प्रार्थना त्यांच्याकडे करतो.
बाकी काम करायला मी घाबरत नाही. अशा चर्चा होत असतात, भाजप-शिवसेनेचे नेते ग्रामपंचायतीपर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत अशा चर्चा करत असतात. अशीच चर्चा माझ्याबद्दल कोणी केली असेल, पण यात काही तथ्य नाही, असा खुलासा अंबादास दानवे यांनी केला. अंबादास दानवे हे कायम आमच्यावर टीका करत असतात परंतु यामागे त्यांचा हेतू आपल्या नेत्यांचा विश्वास टिकून ठेवणे हा असतो, असा चिमटा उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना काढला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.