Ambadas Danve On CM Fadnavis : : महाराष्ट्राने फक्त जीएसटी भरावा अन् केंद्राने तो बिहारच्या झोळीत टाकावा, एवढाच हा खेळ..

Ambadas Danve criticizes the recent budget, stating that Maharashtra should pay the GST and the Center should direct it to Bihar : महाराष्ट्राच्या बोडख्यावर जो हायस्पीड रेल्वे प्रकल्प मारला आहे, तो महाराष्ट्रात कोणी मागितला होता? ही गुजरात धार्जिणी घोषणा महाराष्ट्राच्या नावे खपवू नका.
Devendra Fadnavis, Ambadas Danve
Devendra Fadnavis, Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Budget Reaction News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. या बजेटचे नेहमीप्रमाणे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी भरभरून कौतुक केले, तर विरोधकांनी टीका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बजेट राज्यासाठी आणि देशातील प्रत्येक वर्गासाठी कसे चांगले आहे हे मुद्यांसह पटवून दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र फडणवीसांचे सगळे मुद्दे खोडून काढत बेजटवर टीका केली.

महाराष्ट्राने जीएसटी भरावा अन् केंद्राने तो बिहारच्या झोळीत टाका एवढाच हा खेळ असल्याचा टोला लगावला आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बजेट व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देतांना तुमच्या प्राथमिक आकड्यांना प्राथमिक उत्तर असा चिमटा काढला. मुद्दा 1,2 व 4 केंद्र सरकारच्या लेखी मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांतच महाराष्ट्र सामावला आहे का? मुद्दा 3 -मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टची (एमयूटीपी) मूळ किंमत पण सांगा.. मग त्या आकड्याच्या तुलनेत 511 कोटींची रक्कम ही तुरळक आहे की नाही, हे जनता ठरवेल.

दीर्घकालीन प्रकल्प राबवताना त्यासाठी आतापासून तरतूद केली जाते, यात नवीन ते काय? मुद्दा 5 - महाराष्ट्राच्या बोडख्यावर जो हायस्पीड रेल्वे प्रकल्प मारला आहे, तो महाराष्ट्रात कोणी मागितला होता? ही गुजरात धार्जिणी घोषणा महाराष्ट्राच्या नावे खपवू नका. (Budget) मुद्दा 6 - महाराष्ट्रात या इकॉनॉमिक क्लस्टरचे स्वरूप काय? याचा महाराष्ट्राला कुठे आणि कसा फायदा होणार आहे, याबद्दल कोण स्पष्टता देणार? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

Devendra Fadnavis, Ambadas Danve
Devendra Fadnavis : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

मुद्दा 7 - महाराष्ट्रातील एकूण महामार्गांची लांबीचा 33 हजार किमीच्या पुढे आहे तर ग्रामपंचायती 27 हजारांच्या पुढे. मग हा 683 कोटींचा निधी गावनिहाय असा किती येणार? पोरानं मोठी कॅडबरी मागावी आणि काकाने हाती एक संत्रा गोळी ठेवावी, हा त्यातील प्रकार असल्याचा टोलाही दानवे यांनी फडणवीसांना लगावला. मुद्दा 8 - ऍग्रीबिझनेस नेटवर्कसाठी पैसे दिले खरे, असे आपण म्हणता! मग यापूर्वी घोषित झालेल्या प्रकल्पांची स्थिती काय आहे. त्याचा आतापर्यंत किती शेतकऱ्यांना फायदा झाला?

Devendra Fadnavis, Ambadas Danve
Union Budget 2025 : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत बिहारसाठी घोषणांचा पाऊस; नितीशकुमारांना खूष करत मतांसाठी पेरणी

मुद्दा 9 व 10 - निवडणूक आली की आळंदी-देहू-पंढरपूरचे उंबरे झिजवणारे भाजप नेत्यांना मात्र रसायनाच्या फेसाने व्यापलेले इंद्रायणीचे पाणी दिसले नाही. वारकऱ्यांच्या भावना न जाणणारे, त्यांच्यावर लाठ्या चालवणारे हे सरकार आहे. त्यांना इंद्रायणीच्या काय किंमत कळावी? असा सवाल करत महाराष्ट्राने फक्त जीएसटी भरावा. केंद्राने तो सगळा पैसा राजकीय गरजेपोटी बिहारच्या पदरात टाकावा! एवढाच हा खेळ, अशी सडकून टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com