Union Budget 2025 : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत बिहारसाठी घोषणांचा पाऊस; नितीशकुमारांना खूष करत मतांसाठी पेरणी

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ही संस्था संपूर्ण पूर्व भागातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना बळकट करेल.
Union Budget 2025
Union Budget 2025Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 01 February : विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून बिहारसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बिहारसाठी नवीन योजना जाहीर करताना मोदी सरकारने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खूश करतानाच मतांसाठीची पेरणीही केली आहे. यात बिहारमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ, मखाना बोर्ड आणि पटना आयआयटीचा विस्तार या प्रमुख घोषणांचा समावेश आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) लोकसभेत २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. त्यात बिहार विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तसेच, केंद्रात महत्वाचा भूमिका बजावणाऱ्या नितीशकुमार यांनाही खूष करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे.

बिहार (Bihar) राज्याच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बिहारमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ बांधणार आहेत. पटना विमानतळाचा विस्तारही करण्याची घोषणा या वेळी केंद्रीय मंत्री सीतारामण यांनी केली आहे. मिथिलांचलमधील ‘वेस्टर्न कॉस्ट कॅनॉल’ प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे.

मखानाचे (फॉक्स नट) उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि व्यापार सुधारण्यासाठी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. बिहारच्या लोकांसाठी ही विशेष संधी आहे. यातील उद्योजकांना FPO मध्ये संघटित केले जाईल. मखाना उत्पादक शेतकऱ्यांना मदत आणि प्रशिक्षण सहाय्य देण्यासाठी आणि त्यांना सर्व संबंधित सरकारी योजनांचा लाभ मिळावा, याची खात्री करण्यासाठी काम केले जाईल, असे अर्थमंत्री सअीतारामन यांनी सांगितले.

Union Budget 2025
Budget 2025 Session LIVE : मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

पटना आयआयटीचा विस्तार करण्याची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयआयटीची क्षमता वाढविण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशातील पाच आयआयटीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पटना आयआयटीचा विस्तार करण्याची घोषणाही सीतारामन यांनी केली आहे.

बिहारमधील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

  • बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

  • ही संस्था संपूर्ण पूर्व भागातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना बळकट करेल.

  • या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारून त्यांचे उत्पन्न वाढवतील.

  • या संस्थेमुळे युवकांना कौशल्य, उद्योजकता आणि रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत.

Union Budget 2025
Ashok Dhodi Murder Case : सख्खा भाऊ पक्का वैरी! शिवसेना नेत्याचा भावानेच केला घात, अशोक धोडी यांच्या मृत्युचं गूढ उलगडलं

कोसी, मिथिलाला मोठी भेट

  • बिहारमध्ये नवीन ग्रीन फील्ड विमानतळ बांधणार

  • पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाला आर्थिक मदत

  • कोसी कालव्यातून ५० हजार हेक्टर सिंचन

  • मिथिलांचलसाठी सिंचन योजना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com