Maharashtra Women Safety Crisis : महिलांसंबंधित क्राइम रेषो धक्कादायक! आदिती तटकरेंनी 10 महिन्यांचा आकडा सांगितला; ‘हा नंबर खूप मोठा’, विजया रहाटकर बोलून गेल्या

Over 16608 complaints crimes against women registered Maharashtra just 10 months, raising serious concerns over women safety across the state : महाराष्ट्र राज्यातील महिलांसंबंधी क्राइम रेषोची महिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळात माहितीवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रतिक्रिया दिली.
Women Safety Crisis
Women Safety CrisisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra women crime news : महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंताजनक वास्तव समोर आले असून, गेल्या 10 महिन्यांत राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या तब्बल 16 हजार 608 तक्रारी दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा आकडा जाहीर केला असून, वाढत्या घटनांमुळे गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'राज्यातील महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा आकडा निश्चितच खूप मोठा आहे. अनेक तक्रारी आयोगापर्यंत पोहोचतात आणि त्या प्रत्येक तक्रारीची गंभीरपणे दखल घ्यावी लागते.'

रहाटकर म्हणाल्या की, आयोगाकडे (National Commission for Women) येणाऱ्या प्रत्येक तक्रारीकडे केवळ नोंद म्हणून पाहिले जात नाही. जर तक्रारींकडे दुर्लक्ष केले, तर पीडित महिलाच प्रश्न विचारतात की त्यांच्या न्यायासाठी मग पुढे कोण उभं राहणार? त्यामुळे प्रत्येक तक्रार अधिकृतरीत्या दाखल करून त्यावर आवश्यक ती कार्यवाही सुरू केली जाते.

Women Safety Crisis
Dowry Case : हुंड्यासाठी क्रूरतेची परिसीमा! गर्भवती विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल; पतीसह चौघांवर गुन्हा

त्यांनी स्पष्ट केले की, महिला आयोग फक्त तक्रार नोंदवून थांबत नाही, तर त्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करतो. नारी मार्गदर्शन केंद्रांद्वारे महिलांना कायदेशीर सल्ला दिला जातो, वकिलांकडे पाठवले जाते आणि त्या प्रक्रियेवरही आयोग लक्ष ठेवतो.

Women Safety Crisis
55 Minor Girls Mothers : अकोले हादरलं! 55 अल्पवयीन माता; आदिती तटकरे यांच्या खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, राज्य बालहक्क आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

कौटुंबिक वादाच्या तक्रारी आल्यास संबंधित दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. गरज भासल्यास प्रकरण पोलिसांकडे वर्ग केले जाते. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आयोग प्रकरण सोडत नाही. दोषारोपपत्र दाखल झाले का, सुनावणी कुठपर्यंत आली, न्यायप्रक्रिया सुरू आहे का? यावरही सातत्याने लक्ष ठेवले जाते, असे रहाटकर यांनी सांगितले.

त्यांच्या मते, महिलांसाठी तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आता अधिक सक्षम झाली आहे. त्याचबरोबर महिलांमध्ये कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता वाढली असल्यामुळे अनेक महिला पुढे येऊन तक्रारी दाखल करत आहेत. त्यामुळे नोंदवलेल्या तक्रारींचा आकडा वाढलेला दिसत आहे.

भोंदू अशोक खरात याच्यासारख्या अनेक भोंदूबाबांच्या शोषणाला बळी ठरलेल्या शेकडो महिला, तर बेलापूर, नरसापूरसारख्या चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनांनी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र हादरला आहे. यातच 10 महिन्यांत 16 हजारांहून अधिक तक्रारींचा आकडा, महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारा ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com