Dowry Case : हुंड्यासाठी क्रूरतेची परिसीमा! गर्भवती विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल; पतीसह चौघांवर गुन्हा

Pregnant woman tortured for dowry in Kalyan: हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळाचा कळस गाठत सासरच्या मंडळींनी एका गर्भवती विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Kalyan Maharashtra dowry harassment case
Kalyan Maharashtra dowry harassment caseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Dowry Case: कल्याण-उल्हासनगर परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळाचा कळस गाठत सासरच्या मंडळींनी एका गर्भवती विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष छळाला कंटाळून पीडित महिलेला अखेर सासरच्या तावडीतून पळ काढत माहेरी आश्रय घ्यावा लागला असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित महिलेचे (Woman) नाव अफसाना अन्सारी असून ती मूळची उल्हासनगर येथील रहिवासी आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये तिचा विवाह कल्याणमधील वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटुंबाने आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने हुंडा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच अफसानाचा छळ सुरू झाल्याचा गंभीर आरोप आहे. पीडित महिला गर्भवती असतानाही तिला वेळेवर अन्न दिले जात नव्हते. घरातील उरलेले अन्न मुद्दाम फ्रिजमध्ये कुलूप लावून ठेवले जात होते.

याशिवाय तिच्यावर वारंवार मारहाण (Crime) करण्यात येत होती. वैद्यकीय उपचारासाठी पैसे न देणे, आवश्यक वस्तूंपासून दूर ठेवणे आणि सतत मानसिक त्रास देणे, अशा विविध प्रकारे छळ केल्याचे समोर आले आहे.

Kalyan Maharashtra dowry harassment case
MHADA Colony Attack : श्रीरामपूर हादरलं! मध्यरात्री घरात घुसून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण; गावठी पिस्तुल दाखवत सोन्याची पोत, रोकड लुटली

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने आणि संसार टिकावा या आशेने अफसानाने हा सर्व अत्याचार शांतपणे सहन केला. मात्र 7 जून रोजी अत्याचाराचा कळस गाठला गेला. केस लांब असल्याने बाळाला त्रास होईल, असे कारण देत सासरच्या मंडळींनी तिचे जबरदस्तीने संपूर्ण टक्कल केले.

Kalyan Maharashtra dowry harassment case
Female Lawyer Suicide Case : गेट वे ऑफ इंडियाजवळ सापडला महिला वकिलेचा मृतदेह; 40 कोटींच्या डीलमागील गूढ? ज्येष्ठ विधिज्ञाभोवती कारवाईचा फास

हा अपमान आणि अमानुष वागणूक असह्य झाल्यानंतर अफसानाने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट उल्हासनगर येथे राहणाऱ्या बहिणीकडे धाव घेतली. त्यानंतर तिने आपल्या भावाला फोन करून संपूर्ण घटना सांगितली. बहिणीची गंभीर अवस्था पाहून भावाने तातडीने तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणी पीडित अफसाना अन्सारी हिच्या तक्रारीवरून पती समीर अन्सारी, नणंद हिना अन्सारी, सासू शहनाज अन्सारी आणि सासूच्या मोठ्या बहिणीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com