Ambadas Danve News: महाविकास आघाडी होणार, अजितदादांची राष्ट्रवादीही संपर्कात; अंबादास दानवेंचा दावा!

Chhatrapati Sambhajinagar Politics: एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबायला तयार नाही. दोन दिवसापूर्वी सोबत असलेले, आघाडीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेणारे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.
Ambadas Danve
Ambadas Danve Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Alliance News : महापालिकेसाठी महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमची आघाडी निश्चित होणार आहे, असे सांगतानाच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही आम्हाला सोबत घेण्या संदर्भात प्रस्ताव आल्याचा दावा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. महाविकास आघाडीची अठरा प्रभागातील जागा वाटप निश्चित झाल्याचेही दानवे यांनी माध्यमांना सांगितले.

एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबायला तयार नाही. दोन दिवसापुर्वी सोबत असलेले, आघाडीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेणारे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेत त्यांनी आपली दुसरी इनिंग सुरू केली आहे. तर इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत महाविकास आघाडी अंतिम टप्प्यात आहे. 29 पैकी 18 प्रभागांचे जागा वाटप निश्चित झाल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) पक्षाची महापालिकेत फारशी ताकद नाही, दोन-तीन जागा त्यांच्या आहेत, त्यांचाही आम्हाला आघाडीत येण्यासाठी प्रस्ताव आल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले. लवकरच यावरही आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीमध्ये देखील बैठकांचे सत्र सुरूच आहे. अठरा प्रभागांसाठीचा निर्णय झाला आहे. उर्वरित प्रभागांबद्दल चर्चा सुरू असून, लवकरच त्यावर निर्णय होईल.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित असावी यासाठी काँग्रेस सोबत चर्चा सुरू करण्यात आली आहे. 18 प्रभागांमध्ये आमचे ठरले आहे. उर्वरित प्रभागांमध्ये कुणाचे किती उमेदवार असतील, कोणत्या पक्षाकडे कोणता प्रभाग असेल? याविषयी चर्चा सुरू आहे. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीही महाविकास आघाडीमध्ये सहभागी असेल, असे दानवे यांनी नमूद केले.

Ambadas Danve
BJP News: मंत्रिपदासाठी ऐनवेळी डावललेल्या मुनगंटीवारांचा भाजपात 'एकनाथ खडसे' होणार? विदर्भातील नेत्याचं मोठं विधान

भाजप, शिवसेनेचे इच्छुक संपर्कात

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या भरमसाठ आहे. आमच्याकडे देखील काही प्रभागात 15 ते 17 जण इच्छुक आहेत. असे असले तरी भाजप व शिवसेना या पक्षाकडे ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत, त्यांच्यापैकी काही जणांचे आम्हाला देखील फोन येत आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा दानवे यांनी केला. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खरी रंगत कळेल. कोणाकडे बंडखोऱ्या होतील, कोणाकडे तगडे उमेदवार असतील? यावर विजयाचे चित्र ठरेल, असे दानवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com