Parbhani News : पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या जिंतूरमध्येच महायुती तुटली! राष्ट्रवादीकडून साबिया बेगम यांची उमेदवारी जाहीर

Jintur Municipal Council 2025 : माजी आमदार व बोर्डीकरांचे कट्टर विरोधक असलेल्या विजय भांबळे यांनी नगराध्यक्षपदासाठी साबिया बेगम यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
Jintur Municipal Council Mayor News
Jintur Municipal Council Mayor NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात महायुतीत फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार जाहीर केला आहे.

  2. महायुतीचा गड मानल्या जाणाऱ्या या भागात राष्ट्रवादीच्या निर्णयामुळे राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  3. या घडामोडीनंतर परभणीमधील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

Local Body Election 2025 : परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघातच महायुती तुटली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे राज्यातील नेत्यांनी सांगितले होते. परंतु निवडणुका जाहीर होईपर्यंत स्थानिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या आणि महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवले. शिवसेनाही वेगळा निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे. याची सुरूवात परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, बीड या ठिकाणाहून झाली आहे.

मेघना बोर्डीकर यांचा मतदारसंघ असलेल्या जिंतूरमध्ये महायुती तुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी आमदार व बोर्डीकरांचे कट्टर विरोधक असलेल्या विजय भांबळे यांनी नगराध्यक्षपदासाठी साबिया बेगम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. साबिया बेगम कपिल फारुकी यांच्या नावाची घोषणा भांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. त्यामुळे जिंतूरमध्ये महायुतीतील दोन मित्रपक्षच एकमेकांना भिडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

परभणी व जिंतूरमध्ये बोर्डीकर विरुद्ध भांबळे हा वाद नवा नाही. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली तेव्हा भांबळे यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले होते. परंतु कालांतराने त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि दोन महिन्यापुर्वी त्यांचा पक्षप्रवेश झाला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना शह देण्यासाठी अजित पवारांनी ही खेळी केल्याची चर्चा त्यावेळी होती.

Jintur Municipal Council Mayor News
Meghna Bordikar-Vijay Bhamble News : मंत्री मेघना बोर्डीकरांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी फास आवळणार!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष नंबर एकचा ठरावा, या दृष्टीने भांबळे यांची वाटचाल सुरू आहे. त्याला आता पालकमंत्री मेघना बोर्डीकर कसा लगाम घालतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. साबिया बेगम यांनी याअगोदर दोनवेळा नगराध्यपद भूषविल्याने त्यांना संघटन कौशल्यासोबत नगराध्यक्षपदाचा व प्रशासन चालवण्याचा अनुभव असल्याचे बोलले जाते. यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

Jintur Municipal Council Mayor News
Meghna Bordikar: काय सांगता? दारु विक्री करणाऱ्या ट्रकवर भाजपच्या राज्यमंत्र्याचं नाव!

ही निवडणूक आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ता कपिलभाई फारुकी यांच्यासाठी लढवतोय. कपिलभाई यांचे उभे आयुष्य हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी खर्च झाले. आमच्या भाभींना आम्ही तिकीट देतोय. त्या पैशांनी किंवा प्रॅापर्टीने मोठ्या नाहीत. आम्ही तिकीट देतोय ते त्यांच्या निष्ठेसाठी, हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी. माझे बंधू बाळासाहेब भांबळे इच्छुक असताना त्यांना उमेदवारी न देता ज्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य साधले, घराघरात ज्याचे जिव्हाळ्याचे संबध होते अशा कपिल फारुकी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या घरच्यांना तिकीट देतोय.

कारण शहरात हिंदू-मुस्लिम सलोखा टिकला पाहिजे हा माझा उद्देश, असल्याचे भांबळे यांनी सांगितले. शिवाय नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम समजातून उमेदवार देण्याची मागणी होती. त्याचाही विचार करून भांबळे यांनी सर्व जनतेच्या मनातील उमेदवार दिल्याचा दावा केला. आता मेघना बोर्डीकर यांच्याकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाते? यावर नगराध्यक्ष पदाची लढत ठरणार आहे.

FAQs

1. महायुतीत फूट नेमकी कुठे पडली आहे?
➡️ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळा उमेदवार जाहीर केला आहे.

2. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणासाठी उमेदवारी जाहीर केली?
➡️ त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा उमेदवार घोषित केला आहे.

3. या निर्णयामुळे मेघना बोर्डीकर यांना कितपत फटका बसू शकतो?
➡️ त्यांच्या मतदारसंघातील महायुतीच्या एकजुटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

4. महायुतीतील इतर पक्षांची भूमिका काय आहे?
➡️ स्थानिक स्तरावर नाराजीचे सूर उमटले असून काही कार्यकर्ते द्विधा मनःस्थितीत आहेत.

5. परभणी जिल्ह्यात या घटनेचा राजकीय परिणाम कसा दिसेल?
➡️ राष्ट्रवादीच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत समीकरणं बदलू शकतात आणि नवीन आघाड्या तयार होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com