Meghna Bordikar-Vijay Bhamble News : मंत्री मेघना बोर्डीकरांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी फास आवळणार!

BJP Minister in Trouble as NCP's Vijay Bhamble Demands Meghana Bordikar's Resignation : मतदारंसघात आणि जिल्ह्यात मटका, अवैध वाळू, गुटख्याची विक्री मंत्री महोदयांच्या आशीर्वादानेच सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी किंवा सीबीआयकडून चौकशी केला पाहिजे.
Meghna Bordikar-Vijay Bhamble News
Meghna Bordikar-Vijay Bhamble NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhnai Mahayuti News : राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री अडचणीत सापडले आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात भाजपने फास आवळल्याची चर्चा आहे. यापुर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार, मंत्र्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

जिंतुरच्या भाजप आमदार तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचे नाव असलेला अवैध दारूचा ट्रक पकडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. काही दिवसापुर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार विजय भांबळे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावर अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरून गंभीर आरोप केले आहेत. केवळ अवैध दारूच नाही तर जिंतूरमध्ये अवैध गुटख्याचा व्यापार करणारा व्यक्ती राज्यमंत्र्यांच्या जवळचा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक असल्याचा दावा केला आहे.

एवढेच नाही तर मतदारंसघात आणि जिल्ह्यात मटका, अवैध वाळू, गुटख्याची विक्री मंत्री महोदयांच्या आशीर्वादानेच सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी किंवा सीबीआयकडून चौकशी केला पाहिजे, अशी मागणी भांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सांगीतले. (NCP) जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत मेघना बोर्डीकर यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा, अशी मागणीही विजय भांबळे यांनी केली. एकूणच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात फास आवळण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती असल्याचे दिसते.

Meghna Bordikar-Vijay Bhamble News
Meghna Bordikar: काय सांगता? दारु विक्री करणाऱ्या ट्रकवर भाजपच्या राज्यमंत्र्याचं नाव!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी वाल्मीक कराड याचे नाव समोर येताच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. केवळ वाल्मीक कराड याच्याशी असलेले संबंधच नाही, तर कृषी खात्यातील खरेदीतील गैरव्यवहाराच ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याने अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. मुंडे यांचा राजीनामा इच्छा नसताना घ्यावा लागला, याची सल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात आजही आहे.

Meghna Bordikar-Vijay Bhamble News
Ajit Pawar : माजी आमदार विजय भांबळे पुन्हा अजित पवारांकडे! बाबाजानींना ग्रीन सिग्नल मिळेना..

धनंजय मुंडे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय देखील अजित पवार यांनी जड अंत:करणाने घेतला होता. महायुती असूनही शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनाच टार्गेट केले जात आहे. त्यांच्याविरोधात आरोप केले जात आहेत. त्याला भाजपच्याच लोकांकडून रसद पुरवली जात असल्याचीही चर्चा आहे. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव असल्याच्या निमित्ताने अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.

Meghna Bordikar-Vijay Bhamble News
NCP vs BJP News : अजितदादांच्या मंत्र्यांचं घर फुटलं : सख्खा भाऊ भाजपमध्ये, 8 महिन्यांचे प्रयत्न यशस्वी

माजी आमदार विजय भांबळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. एवढेच नाही तर त्यांच्या राजीमान्याची मागणीही केली. विजय भांबळे आणि बोर्डीकर यांच्यातील राजकीय वैर जिंतूर मतदारसंघच नाही तर संपूर्ण परभणी जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. या निमित्ताने भाजपच्या मंत्र्यांना कोंडीत पकडण्याची चालून आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस दवडणार नाही. विजय भांबळे यांनी थेट मंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव घेत आरोप केल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी पक्ष आग्रही राहणार असे दिसते. अर्थात मेघना बोर्डीकर यांच्यावरील आरोप, राष्ट्रवादीकडून एसआयटी, सीबीआय चौकशीची व राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती गांभीर्याने घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Meghna Bordikar-Vijay Bhamble News
Kailas Gorantyal joins BJP : 'आईना बनने का हर्जाना तो भरना है मुझे'; शेरोशायरी करत काँग्रेसचा 'कैलास' भाजपच्या वाटेवर...

काय म्हणाले भांबळे..

माजी आमदार विजय भांबळे यांनी केवळ अवैध दारूच नाहीतर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आशीर्वादाने राज्यभरात अवैध गुटखा देखील विकला जात असल्याचा गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्यक्ष भेटून या संबंधातील पुरावे देणार असल्याचे भांबळे म्हणाले. मंत्र्याच्या नावाचे स्टिकर लावून अवैध दारू वाहतूक करून विकली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Meghna Bordikar-Vijay Bhamble News
Ajit Pawar : अखेर मारहाण झालेल्या विजय घाडगेंना अजितदादांचा मोठा शब्द; मंगळवारी घेणार निर्णय

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग सुरू केला आहे. त्यांच्याच आशीर्वादाने अवैध दारू राज्यभरात विकली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जिंतूर शहरातून राज्यभर अवैध गुटखा विक्री करणारे हे भाजपचे पदाधिकारी असून राज्यमंत्री बोर्डीकरांचे जवळचे कार्यकर्ते असल्याचा आरोप भांबळे यांनी केला. मंत्री पदाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी न करता अवैध धंद्यांना हातभार लावण्याचे काम त्या करत असल्याचा आरोप भांबळे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com