Mahayuti in Ashti Vidhan Sabha Constituency : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस राजकीय ट्विस्ट वाढत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार असतानाही ही जागा भाजपला सोडून सुरेश धस यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आज आमदार बाळासाहेब आजबे यांनीही जोरदार शक्ती्रपदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने त्यांनाही एबी फॉर्म दिला. त्यामुळे आष्टी मतदारसंघातील महायुती अखेर तुटली.
जिल्ह्यातील आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. ज्यांचा आमदार त्यांचा उमेदवार हे सुत्र असतानाही शेवटपर्यंत त्यांना पक्षाने झुलवत ठेवले.
सोमवारी येथून भाजपच्या (BJP) सुरेश धस यांना यांना उमेदवारी जाहीर केली. धस यांनीही शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वीच या मतदार संघातून भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही अर्ज दाखल केलेला आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महेबूब शेख उमेदवार आहेत.
दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने बाळासाहेब आजबे यांनीही मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काहीच वेळात पक्षाचा एबी फॉर्म बाळासाहेब आजबे यांच्या हाती पडला.
त्यामुळे आष्टी मतदारसंघात महायुती तुटली आहे. आता या मतदार संघातून भाजपचे सुरेश धस व राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) कडून बाळासाहेब आजबे रिंगणात असतील. आता भीमराव धोंडे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.