Karan Sasane : भाजपची चिंता दूर, करण ससाणेंनी घेतली माघार; प्राजक्त तनपुरेंचा विजय पक्का!

Ahilyanagar MLC Election Kiran Sasane Withdraws from MLC Election : अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र, यात त्यांना यश येताना दिसून येत आहे.
Prajakt Tanpure vs Karan Sasane political battle
Prajakt Tanpure vs Karan Sasane political battleSarkarnama
Published on
Updated on

MLC Election : अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपने प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले काँग्रेसचे नेते करण ससाणे हे नाॅट रिचेबल असल्याने त्यांची धडधड वाढली होती. अखेर त्यांनी समोर येत आपली उमेदवारी मागे घेतली.

महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके मैदानात उतरल्या होत्या. तर, काँग्रेसचे नेते करण ससाणे यांनी उमेदवारी न मिळाल्याने थेट अपक्ष अर्ज दाखल करत दंड थोपटले होते. मात्र, नाट्यमयरित्या रणी लंके यांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून करण ससाणे यांना पाठींबा देण्यात येत होता.

अहिल्यानगरमधील संख्याबळ पाहता प्राजक्त तनपुरे यांचे पारडे जड वाटत आहेत. मात्र, निष्ठावंत विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा वाद होऊन त्याचा फायदा विरोधी पक्षाला नको म्हणून भाजपकडून करण सासणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत म्हणून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होती.

Prajakt Tanpure vs Karan Sasane political battle
Jalgaon MLC Election : बालेकिल्ल्यातच महाजनांच्या डोक्याला ताप; शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल, अर्ज मागे न घेण्यावर ठाम

विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट!

भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना ससाणे नाॅट रिचेबल असल्याने मोठा ट्विस्ट आला होता. मात्र ससाणे यांनी माघार घेत तनपुरेंचा मार्ग मोकळा केला. महाविकास आघाडीला अधिकृत उमेदवार वेळेत उभा करता आलेला नाही. मात्र, ससाणे यांच्या उमेदवारीने भाजपच्या गणित सहज सोपे नसल्याची चर्चा होती. अखेर मतांचा विचार करता ससाणे यांनी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.

Prajakt Tanpure vs Karan Sasane political battle
Nashik MLC Election : संकटमोचक महाजनांच्या मिशनला अर्धे यश ; नाशिकमध्ये गोकुळ गिते नॉट रिचेबल, नरेंद्र दराडेंपुढे आव्हान कायम राहणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com