Chhtrapati Sambhajinagar News : तीन संशयित कुत्रे पकडले पण बूट कुणी पळवला? माजी महापौरांच्या बुटासाठी यंत्रणाच कामाला !

Stray Dog take the Shoes of Ex Mayor : बूट पळवणाऱ्या संशयीत कुत्र्यांची कोंडवड्यात रवानगी
Stray Dong
Stray DongSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : अधिकारी-पदाधिकारी म्हटले की रुबाब आलाच. त्यांचे फोन, कपडे अन् बुटाची चर्चा कायम होत असते. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधून एक संतापजनक बातमी आली होती. एका अधिकाऱ्याने फोन तलावात पडला म्हणून लाखो लिटर पाणी उपसले होते. त्यानंतर आता आपल्याच राज्यातील एक घटना समोर येत आहे. यात माजी महापौराचा बूट भटक्या कुत्र्यांनी पळवला आणि त्याचा शोधासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली. (Latest Marathi News)

माजी महापौरांनी घरासमोर महागडा बूट काढून ठेवला. तो एका भटक्या कुत्र्याने पळवला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानुसार त्या कुत्र्याच्या शोधासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली. हे ऐकून नवल वाटलं असेल, पण ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Stray Dong
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची सपशेल माघार; नव्या जाहिरातीत शिंदेंइतकीच फडणवीसांची लोकप्रियता !

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा १५ हजारांचा बूट त्यांच्या घराच्या दारासमोरून भटक्या कुत्र्याने पळवला. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा तो बूट चोरणारा कुत्रा शोधण्याच्या कामाला लागल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात घुसलेल्या दोन कुत्र्याने बूट पळवल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. सीसीटीव्हीच्या आधारावर कुत्रा पकडणाऱ्या यंत्रणेने तीन कुत्र्यांना पकडले. या यंत्रणेला आता बूट नेमका कोणत्या कुत्र्याने चोरला हे ठरवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे 'आरोपी' कुत्रा कोणता हे अद्यापही गुलदस्त्यातच राहिले.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे इटखेडा भागात निवासस्थान आहे. ते शनिवारी (ता. १०) रात्री घरी आले. नेहमीप्रमाणे आपला बूट दारासमोर काढला व ते झोपी गेले. सकाळी पाहतात तर एक बूट गायब होता. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर बूट कुत्र्याने नेल्याचे समोर आले. त्यामुळे घोडेले यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन केला. त्यांनी परिसरात मोकाट श्वान वाढले असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. तसेच आपला बूटच श्वानाने नेल्याचेही तक्रार केली.

Stray Dong
Solapur News: सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या पाडकामाला सुरुवात; परिसरात कडक बंदोबस्त

माजी महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार श्वान पकडणारी गाडी तातडीने इटखेडा भागात आली. त्यांनी मोकाट कुत्र्यांचा शोध घेत तीन 'संशयित' कुत्र्यांना पकडले. मात्र माजी महापौरांचा बूट काही सापडला नाही. आता या यंत्रणेपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. पकडलेल्या या तीन कुत्र्यांपैकी बूट नेणारा नेमका कुत्रा कुठला हा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. सध्या या पकडलेल्या तीनही कुत्र्यांची कोंडवाड्यात रवानगी करण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com