Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Jalna Loksabha Constituency : मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, मराठवाडा दुष्काळमुक्त करू; फडणवीसांची ग्वाही

Devendra Fadnavis News : आमचे उमेदवार मोदी आहेत. तुमचा नेता कोण, चेहरा कोण? बिना चेहऱ्याचे तुम्ही लढताय. ज्या पक्षाकडे नेता नाही नीती नाही, अशा पक्षाला लोक मतदान करणार नाहीत.

Jalna News : देशात मोदीजींच्या नेतृत्वाखालील आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र, मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलला आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, जालना आणि मराठवाडा दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित महाविजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

अमित शाहांच्या येण्याने जालन्याचे वातावरण बदलले. यावेळी रावसाहेब दानवे सगळे रेकाॅर्ड मोडून निवडून येतील. दानवे मराठवाड्याची, जालन्याची शान आहेत. सामान्य माणूस, शेतकऱ्यांचे ते नेते आहेत. देशात मोदींचं सरकार आणि राज्यातील महायुतीच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्याचा चेहरा बदलतोय. समृद्धी महामार्गामुळे जालन्याचे चित्र बदलले आहे.

Devendra Fadnavis
Sanjay Raut On Sharad Pawar : 'शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत आहेत का? हे त्यांनी..' ; संजय राऊतांचं वक्तव्य!

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जालना आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करू. मराठवाडा वाटरग्रीड, पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळवून आण्याचे काम आम्ही करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. पावसाच्या शक्यता लक्षात घेत फडणवीस यांनी छोटेखानी भाषणातही रावसाहेब दानवे यांचे कौतुक केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडून कायम अस्थिर सरकारे...

तत्पूर्वी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या भाषणात इंडिया आघाडीवर टीका केली. सहाव्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आहे, मला पुन्हा निवडून द्या आणि नरेंद्रजी मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, असे आवाहन दानवे यांनी केले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान का करायचे असा प्रश्न ज्यांना पडला, त्यांना सांगू इच्छितो आमचे उमेदवार मोदी आहेत. तुमचा नेता कोण, चेहरा कोण? बिना चेहऱ्याचे तुम्ही लढताय. ज्या पक्षाकडे नेता नाही नीती नाही, अशा पक्षाला लोक मतदान करणार नाहीत.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis
Raosaheb Danve News : ...जेव्हा रावसाहेब दानवे भरस्टेजवरुन काढतात सेल्फी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com