Manali Ghanwat death : धनंजय मुंडेंचे खास असलेल्या राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, म्हणाल्या...

Rajendra Ghanwat wife Death: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मित निधन झालं आहे. पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांचं निधन झालं. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
Anjali Damaniya, Manali Ghanwat death
Anjali Damaniya, Manali Ghanwat deathSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 22 Apr : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मित निधन झालं आहे. पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांचं निधन झालं.

मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. मनाली यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा काही लोक दावा करत असल्याचं दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Anjali Damaniya, Manali Ghanwat death
Walmik Karad : 'आका' जेलमध्ये असला तरीही...; वाल्मिक कराडबाबत DYSP गोल्डेंचा धक्कादायक जबाब, बीड पोलिसांच्या अडचणी वाढणार

त्यांच्या या ट्विटमुळे आता मनाली घनवट यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. याच घनवट यांच्या पत्नी मनाली यांचा पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मात्र, या मृत्यूवर दमानिया यांनी संशय व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत मनाली यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित केली आहे.

Anjali Damaniya, Manali Ghanwat death
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधुंच्या युतीचं भाजपला टेन्शन; BMC जिंकण्याच्या भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लागणार?

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, "खूप खूप धक्कादायक! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडेंच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत.

याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे."

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com