Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Manoj Jagange Patil PC News : आता आमच्या गावात मंत्री, खासदार, आमदारांनी यायचंच नाही...

Antarwali Sarati News : विविध भागात राजकीय पक्षाच्या नेत्यांना विरोध, काळे झेंडे दाखवून त्यांना हुसकावून लावण्याचे प्रकार घडले.
Published on

Maratha Aarakshan : सरकारला झेपणार नाही अन् पेलणारही नाही असे आंदोलन करू, अशा इशारा देणारे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २५ आॅक्टोबरपासूनची दिशा काय असेल हे जाहीर केले. (Manoj Jagange Patil PC News)अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेतून त्यांनी एक महत्वाची घोषणा केली, ती म्हणजे कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्याने यापुढे अंतरवाली सराटी गावात यायचं नाही. केवळ अतरंवालीच नाही तर राज्यभरात त्यांना गावबंदी असेल.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil PC : जरागेंचा एल्गार : सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम ; अन्यथा 25 तारखेपासून पुन्हा उपोषण

अंतरवाली म्हणजेच संपुर्ण राज्य असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अंतरवालीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात यापुर्वी दिसलेल्या लाल दिव्याच्या गाड्या, मंत्र्यांचे ताफे आणि आमदार, खासदारांचा राबता याला आळा बसणार आहे. (Maratha Reservation) मराठा समाज आणि विशेषःत तरुणांमध्ये राजकीय पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्यांबद्दल प्रचंड चीड आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात राजकीय पक्षाच्या नेत्यांना विरोध, काळे झेंडे दाखवून त्यांना हुसकावून लावण्याचे प्रकार घडले.

हा रोष पाहता मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय होऊन जीआर निघत नाही, तोपर्यंत अंतरवालीमध्ये एकाही आमदार, खासदार, मंत्र्यांना येऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. (Jalna) जर कुणी गावात येण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला शांततेच्या मार्गाने मराठा समाज रोखेल. (Marathwada) आमचे मराठे त्यांना हाताच्या कोपराने रोखतील, ते कसे रोखायचे त्यांना चागंल माहित आहे, असा टोलाही जरांगे यांनी यावेळी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२५ आॅक्टोबरपासून अंतरवालीत आमरण उपोषण, त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वत्र साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाची पहिल्या टप्प्यातील दिशा स्पष्ट केली आहे. दुसऱ्या टप्याची दिशा नंतर सांगितली जाईल. सध्या न झेपणारे आंदोलन सुरू आहे, न पेलणारे पुढे ठरवे जाईल, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणासाठी तरुण बलिदान देत आहेत, त्यामुळे समाजामध्ये मराठा आमदार, खासदार, मंत्र्यांबद्दल संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी त्यांना गावात आणि राज्यात बंदीचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मराठवाड्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,खासदार प्रीतम मुंडे, आमदार अशोक चव्हाण, हरिभाऊ बागडे आदींना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com