Jarange Patil Mumbai Morcha: "मुंबईला जायचं फायनल झालंय..."; मनोज जरांगे पाटलांची अंतरवालीतून सर्वात मोठी घोषणा! असा असणार मार्ग...

Jarange Patil Mumbai march announcement today : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईला जाण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षण आंदोलन आणि मुंबई मोर्चाबाबतची ताजी माहिती जाणून घ्या.
Manoj Jarange
Manoj Jarangesarkarnaa
Published on
Updated on

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली असून मुंबईला जायचं फायनल झालंय अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. पुढील आंदोलनाची दिशा यामध्ये ठरली आहे. विशेष म्हणजे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे.

असा असणार मार्ग

बीड जिल्हात पहिला मुक्काम पाटोदा, दुसरा मुक्काम श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्हा. तिसरा मुक्काम हडपसर पुणे जिल्हा, चौथा मुक्काम खोपोली जिल्हा रायगड, पाचव्या दिवशी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.

दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणानंतर पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठा समाजाला अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा बांधव येथे दाखल झाले आहेत. आंदोलनस्थळी सध्या मोठी गर्दी असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे.

Manoj Jarange
High Court : शिर्डी साईबाबा मंदिराबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय! CISF सुरक्षेवर दोन महिन्यात अंतिम निर्णय घ्या, खंडपीठाचे निर्देश

दरम्यान, मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुंबईत आंदोलन करण्याची तारीख आणि पुढील आंदोलनाची दिशा फायनल झाली आहे.

गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे मोर्चा काढण्याचा निर्णय झाल्यास त्याचे मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजासोबतच राज्य सरकारचेही या बैठकीतील निर्णयाकडे लक्ष आहे.

अंतरवाली सराटी येथे जमलेल्या आंदोलकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव एकत्र आल्याचे प्रतिनिधींनी सांगितले आहे.

Manoj Jarange
Nashik Police Bribery Case : 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला, नाशिकच्या हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

गेल्या 15 दिवसांपासून उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि मुंबई आंदोलनाबाबत जरांगे पाटील कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीतील निर्णयानंतर मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com