Video Manoj Jarange Patil : हाकेंचं उपोषण स्थगित ; जरांगेंचा सरकारला इशारा, 'परिणाम भोगायला तयार राहा'

Manoj Jarange Marathas reservation Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना टार्गेटे केले. धनगर समाज आणि मराठ्यांमध्ये दंगल घडवून आणण्याचा भुजबळांचा प्लॅन आहे.
Manoj Jarange
Manoj Jarangesarkarnama

Manoj Jarange Patil : 'छगन भुजबळ रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. मराठा-धनगर समाजात जातीय दंगल लावण्याचा त्यांचा प्लॅन आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मराठ्यांची वाटच लावायची ठरवली असेल तर आमचा नाईलाज आहे. होणारे परिणाम भोगायला तयार राहा. मराठा घरात बसणार नाही.', असं चॅलेंज मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलं आहे.

लक्ष्मण हाके यांचे उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन, अतुल सावे यांना मराठ्यांचे मतदान नकोय का? असं म्हणत जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना Chhagan Bhujbal टार्गेटे केले. धनगर समाज आणि मराठ्यांमध्ये दंगल घडवून आणण्याचा भुजबळांचा प्लॅन आहे. उपोषण करणाऱ्यांना ते वाघ सिंह म्हणत आहेत. त्यांना रस्त्यावर उतरवण्याची भाषा करत आहेत. मग मी हातबांधून गप्प बसू का? असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange
OBC Political Breaking : मोठी बातमी! अखेर दहा दिवसानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारेंचं उपोषण स्थगित

मराठा नेत्यांवर टीका

मी समाजाच्या मागे ठामपणे उभा आहे. मात्र, आमच्यातील काही नेत्यांना काय पडलं नाही. तुम्हाला निवडून द्यायचे काय? आमच्या मताची गरज काय तुम्हाला? मराठ्यांचा द्वेष असेल त्या सगळ्यांना मराठ्यांनी साफ करावं, असे आव्हान देखील जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी केले.

Manoj Jarange
Video Chhagan Bhujbal : "जमाना जानता हैं हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं", भुजबळांचा जरांगे-पाटलांना इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com