Manoj Jarange Vs Narayan Kuche
Manoj Jarange Vs Narayan KucheSarkarnam

Manoj Jarange : ''नारायण कुचे तुम्हाला मी खूप मानत होतो, पण...'' ; मनोज जरांगेंचं विधान!

Manoj Jarange Vs Narayan Kuche : ''याचा अर्थ अंधारातून तुम्ही...'' असंही जरांगे नारायण कुचेंना उद्देशून म्हणाले आहेत.
Published on

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. शुक्रवारी जालन्यात सभा पार पडली. या वेळी त्यांनी भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. मी नारायण कुचेंना अगोदर खूप मानायचो, परंतु आता ते ओबीसी नेत्यांकडे आमच्याविरोधात काड्या करत आहेत असं दिसतंय, असं जरांगेंनी भरसभेत बोलून दाखवलं.

मनोज जरांगे म्हणाले, ''सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळात आमदार नारायण कुचेसुद्धा होते. भोकरदनला जो बोर्ड फाडला, त्याबाबत मी कोणाचंच नाव घेतलं नाही. तरी यांनी नावं दिले आमच्यावर अन्याय होतो असं सांगून. भुजबळांनी म्हटले की ''आमच्या नारायण कुचेंना खूप त्रास आणि रावसाहेब दानवेंनासुद्धा फार त्रास दिला गेला.''

पण आम्ही असा काय त्रास दिला? आम्ही रावसाहेब दानवेंचं नाव घेतलं का?, आम्ही नारायण कुचेंचं नाव घेतलं का? मग आमच्याविरोधात त्यांना मराठ्यांची नाव देऊन, त्यांना आमच्या डोक्यावर चढवतात का?''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Vs Narayan Kuche
Lok Sabha Elections : अजित पवारांची लोकसभेसाठी 'पावरफुल' रणनीती; शिंदे गटाची धडधड वाढवणार!

''आम्ही भोकरदनच्या प्रकरणात काय म्हणालो, ज्यांनी आमचा बोर्ड फाडला त्याचं आम्हाला घर बघायचं आहे, मग नारायण कुचेचं आणि रावसाहेब दानवेंचं नाव त्यांच्या (भुजबळांच्या) यादीत कसं काय गेलं.? तुम्ही त्यांना केव्हापासून नेता मानायला लागले, त्याला तुम्ही गुलाल लावणार आहात का? त्याच्या मतदारसंघात त्यालाच येऊ देईना. म्हणजे हे नावं दिले कुणी?

नारायण कुचे रोज आमच्यासोबत बोलतात आणि म्हणतात मला लोक फिरू देत नाहीत. मी तुमच्याकडे येऊ का? मी तुमच्या व्यासपीठावर येऊन बसतो. तिकडून ते इकडून तुम्ही मी मध्येच मरतोय असं सांगतात आणि तिकडे ओबीसीच्या नेत्यांकडे काड्या करता.''

Manoj Jarange Vs Narayan Kuche
Thackeray Group : आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका आयुक्तांना खडे सवाल; निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर

''नारायण कुचे तुम्हाला मी खूप मानत होतो. तुमच्यामुळे दोनदा मध्यस्थी झालेली आहे. गुन्हे मागे घ्यायलासुद्धा होतात, मग काडी लावायची गरज काय? छगन भुजबळांनी तुमचं नाव कसं काय घेतलं? याचा अर्थ अंधारातून तुम्ही ओबीसीच्या नेत्यांना सांगतात. मराठ्यांकडून गुलाल अंगावर पडला पाहिजे आणि मराठ्यांचीच अडचण करता काय?, तुमचं नाव मी नाही घेतलं, दानवेंचंही नाही. त्यांनी नाव घेतलं तुम्ही सांगितल्याशिवाय घेतलं नाही. मराठ्यांनाे सावध व्हा.''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com