Manoj Jarange News : मी राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल; मनोज जरांगेंचा थेट इशारा

Political News: सत्ताधारी नेतेमंडळींमुळे मराठा आरक्षणाचा विषय रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्य सरकारने 29 ऑगस्टपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्यावा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. त्यांनी राज्यातील राजकारण्यांना पुन्हा टार्गेट केले. सत्ताधारी नेतेमंडळींमुळे मराठा आरक्षणाचा विषय रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्य सरकारने २९ ऑगस्टपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्यावा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. मी माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपासून 12 बलुतेदारांपर्यंतचे प्रश्न मांडत आहे. आता गोरगरीब मराठा शेतकऱ्यांचे राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही, असेही मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Manoj Jarange News)

मला व समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यामध्ये ढकलू नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकणार आहेत. मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका. मी राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल. माझी राजकारणात यायची अजिबात इच्छा नाही. मी जर एकदा त्यामध्ये पडलो तर परिणामाची चिंता करत नसल्याचे सांगत त्यांनी राज्यातील राजकारण्यांना इशारा दिला.

राज्यातील परिस्थिती येत्या 20 ऑगस्टपर्यंत बदलेली दिसेल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काही गणित बांधली आहेत. ती येत्या काळात फेल होणार आहेत. त्यामुळे त्यांना जर समजून घ्यायचे नसेल तर माझाही नाईलाज असल्याचे ते म्हणाले.

Manoj Jarange
Vinay Kore News : जनसुराज्य शक्तीने केला कोल्हापुरातील चार मतदारसंघांवर दावा, महायुतीकडे विनय कोरेंचे साकडे

येत्या काळात फडणवीस यांनी आरक्षण दिले तर मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्ही तुमचे राजकीय गणित बिघडवणार आहात, असे मनोज जरांगे म्हणाले.

आता संघर्ष करायचा पण खुर्ची द्यायची नाही

सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे की, गोरगरिबाला न्याय द्यायचा नाही, मग आता गोरगरिबांनी ठरवले आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. आता संघर्ष करायचा पण आता खुर्ची त्यांना द्यायची नाही. हीच भूमिका शेतकऱ्यांची आहे. सगळ्या जाती-धर्माच्या बांधवांची आहे. दलित मुस्लिमांची आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange
Bjp News : भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? शनिवारच्या बैठकीत होणार चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com