Vinay Kore News : जनसुराज्य शक्तीने केला कोल्हापुरातील चार मतदारसंघांवर दावा, महायुतीकडे विनय कोरेंचे साकडे

Political News : महायुतीमधील घटक पक्षाकडून विधानसभेच्या जागांवर आतापासूनच दावा केला जात आहे. त्यातच आता जनसुराज्य शक्तीने केला कोल्हापुरातील चार मतदारसंघ देण्यासाठी जोर लावला आहे.
Vinay Kore
Vinay KoreSrkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची आतापासूनच महायुतीने तयारी सुरु केली आहे. राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. त्यामुळेच महायुतीमधील घटक पक्षाकडून विधानसभेच्या जागांवर आतापासूनच दावा केला जात आहे. त्यातच आता जनसुराज्य शक्तीने केला कोल्हापुरातील चार मतदारसंघ देण्यासाठी जोर लावला आहे.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागांवर दावा केला आहे. करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, हातकणंगले आणि चंदगड या चार मतदारसंघांवर जनसुराज्य पक्षाने (Jansurajay Party) मागणी केली आहे. त्यामुळे महायुती आता जागावाटपानंतर किती जागा सोडणार याकडे लक्ष लागले आहे. (Vinay Kore News)

कोल्हापूरमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. महायुतीच्या सात खासदारांमधील एक खासदार तुम्हाला जनसुराज्य शक्ती पक्षाने दिला आहे. महायुतीमध्ये आम्हाला सन्मानाने जागा द्या. कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळाल्याच पाहिजेत.

करवीर विधानसभा मतदारसंघाचा येणारा आमदार जनसुराज्य शक्ती पक्षाचा असणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूरमधील एकूण 15 जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी विनय कोरे यांनी केली आहे.

Vinay Kore
Bjp News : भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? शनिवारच्या बैठकीत होणार चर्चा

त्यासोबतच करवीरमधून सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे यांना उमेदवारी देण्याची मागणी कोरे यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये स्थापन झालेल्या आपल्या पक्षाने गेल्या काही वर्षांत पक्षाने अनेक चढ उतार पाहिले आहेत. मात्र विचार कधी सोडला नाही. करवीरमधून आमदार होणाऱ्या व्यक्तीने जिल्ह्यात या मतदारसंघाचे नाव घेतलं जावे, असं काम कधी केले का? त्यामुळे आता करवीर विधानसभा मतदारसंघातून संताजी घोरपडे यांना आपण समोर आणायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

2004 विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे चार आमदार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने माझ्याकडे पाठिंबा मागितला होता. त्यावेळी जोतिबाला मानणाऱ्या सामान्य कुटुंबातील आर. आर. पाटील यांना उपमुख्यमंत्री करणार असाल तर माझ्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा असेल, असे मी सांगितलं होते. त्यानंतर आर. आर. आबांना गृहमंत्री करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Vinay Kore
Omraje Nimbalkar News : ओमराजे निंबाळकरांसमोरच परभणीतील शिवसैनिकांनी व्यक्त केली खदखद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com