Jalna News : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा लढा आम्ही जिंकला, सगळे मराठे आता ओबीसीत गेले असा दावा करत असले तरी त्यांच्या या दाव्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांना कायदा आणि शासन आदेश यातला फरकच कळत नाही, अशी टीका मराठा आरक्षणाचे अभ्यासक तथा समन्वयक डाॅ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना तो आपण एकटेच ओढत आहोत, असे वाटत असल्याचा टोलाही पाटील यांनी त्यांना लगावला. 'एबीपी माझा'वर मराठा आरक्षण व त्यासंदर्भात काढलेल्या जीआर विषयावर संजय लाखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. तसेच मनोज जरांगे पाटील आणि सरकारने समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही लाखे पाटील यांनी यावेळी केला.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे स्वत:चे महत्व वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. ते समस्त मराठा समाजाचे नाही तर कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. जरांगे यांनी केलेली एकही मागणी वैध, कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही. मनोज जरांगे पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून मराठा समाजाचे नुकसानच केले आहे. आंदोलनातून स्वत:ची बुवाबाजी चालवून आपल्यापुढे कोणी कॅमेरासमोर जायला नको, असा त्यांचा कायम प्रयत्न असतो.
मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना टार्गेट करण्याचं काम ते सूत्रबद्ध पद्धतीने करत आहेत, असा आरोपही संजय लाखे पाटील यांनी यावेळी केला. मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता. केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळला गेला.
आधीच सरकारसोबत ड्राफ्ट तयार करतात आणि मग अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचे नाटक करून समाजाची फसवणूक करतात, अशी टीका लाखे पाटील यांनी जरांगे यांच्यावर केली. आरएसएसच्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत. मराठा समाजाची राधाकृष्ण विखे पाटलांनी बेईमानी केली, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.