Manoj Jarange: 'येवल्याचा येडपट' उल्लेख करत जरांगेंनी भुजबळांवर डागली तोफ ; भुजबळांना कुणी मंत्री केलं?

Maratha Reservation: शांतताप्रिय मराठ्यावर सरकारने खोटा डाग लावला.
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal
Manoj Jarange Vs Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Beed News: 'मराठ्यांच्या एकजुटीचा हा महाप्रलय बघून त्या येवल्यातल्या येडपटाच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही,' असे म्हणत मनोज जरांगेंनी बीडच्या सभेला सुरवात केली. भाषणाला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी व्यासपीठावर नतमस्तक होऊन उपस्थित मराठा समाजाला नमस्कार केला. छगन भुजबळांची नक्कल करत जरांगेंनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काल (शुक्रवारी) भुजबळांनी पत्रकार परिषदेत जरांगेंची खिल्ली उडवली होती. त्याचा समाचार जरांगेंनी आज (23 डिसेंबर) बीडमधील जाहीर सभेत घेतला. भुजबळ आधीच चांगले वागले असते तर बरं झाले असते. आता ते मला जरांगे साहेब म्हणत आहेत, आरक्षण मिळू देत मी त्यांना कचकाच दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलले तर त्याला सोडणार नाही. भुजबळांना कुणी मंत्री कोण? असा सवाल त्यांनी केला. शांतताप्रिय मराठ्यावर सरकारने खोटा डाग लावला, असा आरोप जरांगे-पाटलांनी सरकारने अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्ज घटनेचा समाचार घेतला.

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal
Sachin Sawant: ...मग यशवंतरावांची समाधी आहेच, आत्मक्लेश करायला! सावंतांनी अजितदादांना काढला चिमटा

जरांगे म्हणाले, 'मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझं नातं हे माय-लेकाचं आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पिढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झालं. आता मराठा जागा झाला आहे,'

जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून 24 डिसेंबरच्या अल्टिमेटममुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांची निर्णायक इशारा सभा झाली. सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबर पहाटे चारपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर7 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले मनोज जरांगे...

  • मायबापहो तुम्हाला शब्द देतोय, तुमच्या एकजुटीची ताकद वाया जाऊन देणार नाही..

  • आपल्याला 100 टक्के आरक्षण मिळणारच

  • देव जरी आडवा आला तर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देणार

  • आता सरकारला वठणीवर आणल्याशिवाय थांबायचं नाही

  • जर कुणी दंगल करायला लागला, कुणी जाळपोळ करायला लागला तर त्याला तात्काळ पकडून पोलिसांकडे द्या

  • तुमचा सुफडा साफ करूनच हा मराठा थांबेल तोपर्यंत थांबणार नाही.

  • कुणाला जाळपोळ करू द्यायचं नाही

  • आपल्या माणसाकडून कुठंही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायचीय

  • आमच्या लेकरांचे मुडदे आम्ही बघू शकत नाही

  • आंदोलन करायचं मात्र शांततेत

  • शब्द पाळायचा पण मोडायचा नाही.

  • मराठा समाजाला आता डिवचू नका

Edited by: Mangesh Mahale

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal
Jitendra Awhad: आव्हाड एकाकी पडल्याने भ्रमिष्ट; मुश्रीफांच्या विधानानंतर आव्हाडांनी काढला मंडलिक-मुश्रीफ वाद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com